साहित्य.


-२- छोटे मारी बिस्कीटचे पुडे२- चमचे चॊकलेट पावडर२- वाट्या बदाम पुड१- वाटी काजु पुड२- वाटी सुक्या नारळाचा चवदीड वाटी पिठी साखर.१- टीन कंडेन्स मिल्कअर्था वाटी दुध.


कृती

१. मारी बिस्कीट मिक्सरवर फाईन बारीक करून घ्यायचे, एका प्लेट मध्ये ओतुन त्यामध्ये दोन चमचे चॊकलेट पावडर, एक वाटी बदामाची पुड पाऊन टीन कंडेन्स मिल्क घालुन ते पिठ मळतात तसे मळुन घ्यायचे, मळताना थोडे- थोडे दुध ही घालायचे, ( पुरीला जेवढे घट्ट मळतो तेवढे घट्ट मळायचे ) आणि साधारण त्या पिठाचे तीन गोळे करायचे. (चॊकलेटी कलरचा गोळा तयार होतो.)


२. आता आतील सारणासाठी - दोन वाट्या नारळाचा चव , एक वाटी बदाम पुड, एक वाटी काजुची पुड (फक्त काजु किंवा फक्त बदामची पुड असेल तरी चालेल, किंवा दोन्ही पैकी एकाची पुड घेऊन, एक वाटी मिल्क पावडर घालुन ही वडी बनविता येते.) पाव टीन कंडेन्स मिल्क, दीड वाटी पिठी साखर घालुन सर्व एकत्र करून घ्यावे, एकत्र करताना थोडेसे दुध ही घालावे.ह्या सारणाचे ही तीन गोळे करून घ्यावेत.


३. चॊकलेटी कलरच्या गोळ्याला तुप लावुन ते मध्य जाडी पर्यत लाटावा, दुस-य़ा बाजुला सारणाचा गोळा चॊकलेट्या गोळ्याच्या पोळे पेक्षा जरा कमी साईजचा लाटावा, लाट्ताना तुप लावावे, (मध्यम आकार झाल्यावर तो उचलुन चॊकलेटी पोळीच्या वर ठेवुन हाताने पसरविला तरी चालतो ) आणि त्याचे हलके दाबत रोल करावेत, रोल फ्रीज मध्ये २ तास ठेवुन द्यावेत.आणि मग त्याच्या वड्या पाडाव्यात.

0 comments

Post a Comment