|
0
comments
]
ब्लॉग (Blog), एक माध्यम - तुमचे आमचे विचार जगासमोर मांडण्याचं - मग ते विचार काहीही असोत, फ़क्त एकच - ते ह्रुदयातुन यायला हवेत. मला वाटते की, एखाद्या विषयावर मत मांडणे म्हणजे किती अभ्यास करावा लागतो, नाही का? पण एकदा का ते विचार, तो अभ्यास तुमच्या मनातून या ब्लॉगर (Blogger) च्या माध्यमातून जगासमोर यायला लागला की, केलेल्या कामाचे चीज झाले असे वाटते.
खरेतर ब्लाँगिंगच्या या कार्याचा अथवा या माध्यमाचा पसाराच इतका मोठा आहे की, तो साधारण माणसाच्या डोक्यावरून अगदी समांतर जात राहतो. त्याला हे लवकर काळात नाही की Blog म्हणजे नेमके काय किंवा माझ्या मनातील या आंदोलनाला मी जगासमोर कसे मांडू?
त्यासाठीच हा एक प्रयत्न करीत आहे जो नवीन तरुण आणि तरुणींना हमखास कामास येइल.
तुमचे हे विचार जगासमोर मांडल्यास त्याचा त्याला किंवा तिला नक्की काय फायदा होणार आहे? याचे गणित ब-याच जणांना माहिती नाही. काँलेजमध्ये शिक्षण घेत असताना घरी आई-वडिलांजवळ Pocket Money मागने जर खरेच बंद करायचे असेल आणि commercial life ला सुरुवात करण्या अगोदर स्वत:च्या पायावर उभे राहायचे असेल तर Blogging सारखा दुसरा कोणताही मार्ग नाही याची खुणगाठ सर्व भारतीय तरुण तरुणींनी आत्ताच मनाशी बांधून ठेवा.
मित्र-मैत्रिणींच्या गप्पांमधुन, एवढेच कशाला तुम्ही सर्वानी अमिताभ बच्चन चा "Blog B" तसेच आमिरखान आणि शाहरुख खान यांचा ब्लॉग वाचला असेलच! काय आहे तो प्रकार नेमका? असे हे लोक यामध्ये काय लिहितात की सारी तरुणाई अभ्यास आणि जेवण सारे बाजुला ठेउन Computer Screen वरील माहिती वाचण्यात दंग होतात? जेवढे कॉलेज ची lecture करण्यात त्यांना रस नसतो तितका हे Blog वाचण्यात असतो. काय आहे हा प्रकार? आजकाल तर एखादा नवीन मित्र जुन्या टोळक्यात घुसला की त्याच्या कानांवर WebPage, Page Rank, URL, Backlink, Forum, Dating, Website, हे आणि असे बरेच प्रकार ऐकायला मिळतात.
या साठी तुम्हा सर्वाना विना अट आणि एकही नवा पैसा खर्च न करता या Blog School मध्ये admission घ्यायची आहे. या Blog School मधून निघालेला माझा प्रत्येक Student परत - परत या Blog School ला भेट दिल्या शिवाय रहाणार नाही याची मला खात्री आहे.
तेव्हा - Blogging School चा Student होण्याची तयारी करा आणि (शिका आणि कमवा - Learn-And-Earn) ही संकल्पना मनात बाळ्गुन पुढची वाटचाल करा - आणि पहा काहीही खर्च न करता (हो, एक सांगायचे राहुनच गेले - चांगला Computer अथवा LapTop, Internet Connection आणि तुमचा वाया जाणारा अमूल्य वेळ यांची गुंतवणूक करा) या recession च्या काळातही पैसे कमवायला शिका.
चला तर मग, या Blogging विश्वातिल एकेक गोष्टिंची माहिती घ्यायला!
0 comments
Post a Comment