कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,

गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....

गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,

तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....


अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,

चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....

आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,

चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!

0 comments

Post a Comment