सावळ्याची काया
चंद्राचा मुखडा
मायाळती माया
भाकर तुकडा
जोंधळ्याचे दान
पदरी फाटक्या
गोंधळ्याचे भान
जागरी हिरव्या
कोरड्या काठांनी
एकटी चंद्रभागा
चुकली ग वारी
रूसला ग विठा
मिरगाचा पान्हा
कोरडा आटला
आसवांचा पाट
भरून वाहिला
ढवळ्या संगती
धनी ग जूंपला
चिमण्या चोचींनी
पवळ्या विकला
गाडगे फुटके
औंदाच्या सुगीला
विझल्या चूलीचे
चटके पोटाला
तिरडीच्या दिंडी
हरिनाम सोहळा
पंढरीच्या वाटी
उपाशी कावळा.
- क्लोरोफॉर्म.
|
0
comments
]
0 comments
Post a Comment