सखे,

अगं ऐक ना

अगं तो..तो....

ऐन चैत्रात बंडाचा लाल झेंडा उभारत होता

म्हणून, त्याला म्हटलं

काय हे ?

एवढा काय पेटतोस ?



तर

इतका चिडला..

इतका चिडला..

आषाढापर्यंत धगधगतच राहिला

रस्ताभर ठिणग्या

मी जाणच बंद केलं त्याच्या गल्लीतनं..



४ महिने वागून घेतलं मनासारखं त्यानं

आणि

आणि आता म्हणे..

चक्क

" शांती , शांती " म्हणत हिरवी शाल पांघरुन बसणार आहे वर्षभर



सोंगाड्याच आहे नुसता..



- स्वप्ना

0 comments

Post a Comment