ध्यानि मनी नसताना.. एका क्षणी.. आयुष्यात मैत्री प्रवेशते...
हिरव्या श्रावणात.. हातावर रंगलेल्या.. मेंदी सारखी..
आयुष्यभर.. आठवत रहाते...!

मैत्री म्हणजे.. एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं...

मैत्री म्हणजे.. कधी कधी.. स्वत:लाच आजमावणं असतं....

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघडतं..
हळ्व्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं..

मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं...
' प्रेम '! परमेश्वरानं माणसाला दिलेली.. सर्वात सुंदर गोष्ट !

मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'...
मैत्रीतुनच फुलतात नाती.. फुलपाखरासारखी...

इंद्रधनुष्यी रंग लेवुन.. फुलपाखरु आकाशात झेपावते..
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते....

- चंद्रशेखर.

1 comments

Anonymous said... @ May 18, 2009 at 10:31 AM

mast wow gr8

Post a Comment