पुरे पुरे हा बहाणा
सोड राग जीवघेणा
गडे , तुझा हा अबोला
आता मला साहवेना
गोड प्रेमळ शब्दांची
नित्य बरसात व्हावी
आणि तुझ्या लोचनांत
माझी प्रतिमा दिसावी
खोटा खोटा रुसवा
बघ क्षणात निवेल
तव प्रेमाच्या सिंचने
प्रितवेल बहरेल

पुर्वेचि केशरलाली
कशी पसरली गाली
तुझ्या मुग्ध हसण्याने
खूण प्रितीची पटली
------संगीता सावंत कोथरुड , पुणे.
------८८२००९.

0 comments

Post a Comment