हसऱ्या मुखवट्यात फिरताना आरास दिव्यांची भवति..
सडा फुलांचा अन हास्याची कारंजे दारी उडत होती ..
उतरवाच मुखवटा तो ..चित्र रात्रीपारी मावळले ..
पाणी पडले त्या चित्रावर जसे दिवे तेथले सारे हळूच विझले ..
दिसले दुख तिला...पण तेव्हा कोणीच जवळी न्हवत ....
एकटीच आणि सोबत एका मंद दिव्याची वातच तेवढी तेवत ..
वातही ती जणू शोभेची बाहुली ..देखाव्याला बसलेली ....
विझली नसली तरीही ....फिकीर सोडून सारी शांत निझलेली ..
अंधार फक्त स्तब्ध बघत होता ..निष्पाप बाळासारखा कदाचित जाणून बुजून ..
जणू आयुष्यभराचे ऋण करतोय त्या तोरयाने वाऱ्याला अडवून मंद उजेड ठेऊन ..

चार भिंतीतल्या दार खिडक्या पण दूर निघून गेलेल्या ...
आत आणून तसच टाकून रस्ता सांगण्यास विसरलेल्या ...

या सर्वांमध्ये एकटीच ती....
मुखवट्याचे आणि चेहऱ्याचे आज खरे सत्य कळले ..
पण का ..अजून नाही मनाने या मुखवट्याला नाकारले ...

का अजून मन शोधताय सत्य आणि स्वप्नांची सांगड ...
ठावून असून कि ते सूर्य चंद्रापरी एकत्र येणंच अवघड ...
प्राजक्ता
१०-८-०९

0 comments

Post a Comment