विझून गेल्या सगळ्या आशा
आकांक्षाही मग मावळल्या
तिमिर हा दाटे चोहिकडे
तरीही ,सांजवात मी लाविते
सखी ,सांजवात मी लाविते
मनात काहूर माजलेले
धुमसती विझले निखारे
फुलती या नयनी अंगारे
तरीही , अखंड प्रज्वलते
सखी, सांजवात मी लाविते
वारा वाहे असा सैरावैरा
सागरही आहे खवळला
भीषण वादळ घोंगावते
तरीही , निरंजन तेवते
सखी, सांजवात मी लाविते
आता कशाशी नुरले नाते
एकले येणे एकले जाणे
धूसर धूसर चित्र सारे
तरीही , वाट पुढे सारते
सखी, सांजवात मी लाविते
------संगीता सावंत कोथरुड,पुणे.
------५८२००९.

0 comments

Post a Comment