परवाच पाऊस येउन गेला,
कुणीतरी आठवण काढते आहे !
असा निरोप देऊन गेला .
त्याचा प्रत्येक थेंब
माझ्या भेटीसाठी तरसलेला
आणि माझ्या सर्वांगावर
शब्द होउन बरसला.
मी त्याला विचारले
पावसाळा नसताना तू का आला ?
तर तो माझ्यावरच ओरडला
तुला माहित नाही का
तो तुझा वेडा प्रिया.
डोळ्यात पकडून ठेवतो मला
मग माझा कोंडमारा होतो
मी क्षणोंक्षणी झुरत राहतो
चल आताच माझ्या बरोबर
आणि मुक्त कर मला.
मी म्हटले तू पण वेडाच आहे
बघ माझ्या डोळ्यात
त्यात तोच आहे
पण मी नाही झुरत,
माहित आहे मला
तो माझाच आहे.
मला काही झाले तर
तो कसा राहिल ?
माझ्या शिवाय माझे
दु:ख तो एकटा कसा वाहील ?
आल्या पाउली परत फिर
माझ्या प्रियाला निरोप दे
सांग मी फ़क्त त्याचीच आहे
फ़क्त शब्द नाही येत ओठावर
पण वेडे मन त्याच्याच वाटेवर
सांग त्याला डोली सजवून आणायला
त्याच्या प्रियेला घ्यायला
मी त्याचीच वाट बघतेय
सांग माझ्या प्रियाला.
तो पण आनंदाने
आल्या पाउली परत गेला
आणि पहाटेचा गारवा होउन
निरोप घेउन आला.
अंगावर रोमांच फुलवून
बसला मिठीत घेउन
आणि दवबिंदू उधळून हसला
म्हणाला तू मला मुक्त केले.
मी रोज येइन तुझ्या भेटीला
आणि तुझ्या प्रियाचा स्पर्श
आणेल माझ्या साथीला
आता तो रोजच येतो
साथीला प्रियाचा निरोप
अन् स्पर्श देऊन जातो,
तो रोजच पहाट गारवा होउन येणार आहे
माझ्या प्रियाचा निरोप देणार आहे.
माझा प्रिया येई पर्यंत
मला दवबिंदूत भिजवनार आहे.
--- ----- ------------------------ बाजी
|
0
comments
]
0 comments
Post a Comment