भले हिटलर नसेल आज
पण आहेत त्याच्या खुणा,
जागोजागी , क्षणोंक्षणी
जाणवतात पुन्हा पुन्हा || १ ||
भयाने कोंडटलेले श्वास
अन् रक्ताळलेले भास्
विस्फारलेले डोळे
बघतात मुडदयांची रास || २||
गोळयांचे पाऊस
आणि बेधुंद आग
घोंगावताना मृत्युला ही
रक्ताचाच माग || ३||
सरणावर प्रेत
जळण्याचे विसरते
जवानीचे पोरीच्या
गिधाड लचके तोड़ते || ४||
पिसाळलेल्या लांडग्याला
लावतात मेंढ़यांची वाघर ,
राजाच जाळतोय
स्वत:चेच नगर || ५ ||
स्वस्तात मरणाचा
लिलाव चालूच असतो
फ़क्त नंबर कुणाचा
शोधत आम्ही बसतो || ६ ||
समरभूमीचे पाईक
आज झाले षंड
थिजलेल्या रक्ताने
होइल का बंड ? ||७||
वैदाचे पोर फिरतात
कुत्र्या शिवाय शिकारीला
दारोदार वैदीन मागते
कालच्या शिळया भाकरीला || ८ ||
---------------------------------- बाजी
|
0
comments
]
0 comments
Post a Comment