भंगली ती प्रीत आता
संपले संदर्भही;
थांबलेली तू तिथेच
आणि मी मात्र प्रवाही...
वेगळाळल्या आज वाटा
आता एकटीच पाऊली
संग सुटे सकलांचा
हरवलेली सावली...
सुगंध जपला तुझ्याचसाठी
झाले फूलच त्याला पारखे
मृत भावना या मनाला
आता उन-पाऊस सारखे...
वचन देते मी तुला रे
भंगलेला शब्द तो
बंध जरी तो मोडलेला
पण वेदना मी साहतो...
आज डोळ्यांत अश्रु आले
पुसून टाकल्या खूणा
जिंकण्यासाठी सिद्ध झालो
जरी एकटा मी पुन्हा...
- श्रेयस
|
0
comments
]
0 comments
Post a Comment