वरळी कोळीवाड्यातील प्रमुख देवस्थान म्हणजे गोलफादेवी! उंच टेकडीवर असलेले हे मंदिर १२ व्या शतकात बिंबराजाने बांधल्याची आख्यायिका आहे. गोलफादेवी , साकबादेवी आणि हरबादेवी अशा तीन मूर्ती मंदिरात आहेत. सौम्य रूप असलेल्या गोलफादेवीचा उल्लेख पुराणांमध्येही आढळतो. पौष शाकंबरी पौणिर्मेला भरणारी देवीची यात्रा , चैत्र शुद्ध अष्टमीचा भवानी उत्पत्ती महोत्सव आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत चालणारा शारदीय नवरात्र हे देवस्थानातील तीन महत्त्वाचे उत्सव! कोळी , भंडारी आणि ईस्ट इंडियन या जमाती देवीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिराचा जीणोर्ध्दार सुरू असून लवकरच ते नव्या वास्तूत दर्शनासाठी खुले होईल असे जीणोर्द्धार समितीचे अध्यक्ष विलास वरळीकर यांनी सांगितले.
0 comments
Post a Comment