कोण असे तो

सर्वात मोठा व्यापारी

लिखित म्हणावे की अलिखित

पण नाहीच काही शंका यात...



मिळवूनी देई तो

खुप काही क्षणार्धात

आईला मातृत्व

आणि बाबांना अभिमान...



जाऊ नका त्याच्या वयावर

वयाचे बंधन नसते त्याला

अबोल असे मुख त्याचे

रडणे जणू त्याचा आदेश...



सेवेसाठी आतुर सर्व

काका, मामा, आजी आणि खुप जण

पगार द्यावाच लागत नाही

म्हणून असतो नफाच नफा...



नुकतेच जन्मलेले बाळच ते

न बोलता बोले सर्वकाही...

--हरिष मांडवकर

२७-४-२००९.



(ही कविता माझी आहे पण concept माझा नाही.....

हा concept आमच्या BSc(IT) च्या सरांचा आहे...

या concept मध्ये,

एक लहान नुकतेच जन्म घेतलेले बळ अजाण असते...पण तो खुप काही मागू शकतो..

त्यासाठी त्याला बोलायची गरज सुध्हा लागत नाही..

सर पुढे म्हणतात की, तो सर्वात मोठा व्यापारी असतो अगदी १ ही ल्या सेकंदा पासून...

खुप जन सेवेला असतात..काका, काकी, मामा, मामी, आत्या, आजी आजोबा,आई-बाबा.आणि ही सेवाही मोफत असल्या मूले पगाराची चिंताच नसते...रडन्या मधून तो सर्व आवश्यक गोष्टींची मागनी करतो...)





















तुझे लाजणे असे अवेळी
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...

वारा देखील मंद जाहला
सखी साजणी ...
आसपास तो फक्त केवडा
गातो गाणी ...
अश्याच समयी तुझी शांतता
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...

सांज अताशा निखळत आली
क्षितिजावरुनी ...
लाटांचे बघ फक्त बोलते
हळवे पाणी ...
तरी मनांची लाट कोरडी
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...

संतोष (कवितेतला)

भावना गोठल्या,जागवू मी कशी ?
वेदना दाटल्या,झोपवू मी कशी ?

शब्द झाले मुके, सूर ही पोरके
गीत ओठातुनी, आळवू मी कशी ?

सारले मी तुला,दूर केले कधी
मेळ आता बरे, घालवू मी कशी ?

नीर क्षीरात किती, क्षीर नीरात किती?
सांग कोड़े अता सोडवू मी कशी ?

आठवेना मला, गुंतले मी किती ?
पाय गुंत्यातुनी ,सोडवू मी कशी?
.
...अरविंद

उद्या मी मेल्यावर...
फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...
सांत्वन नाही केल जरी कोणी ...
तरी त्याच ते दुख: खर असाव...

उद्या मी मेल्यावर...
सगळ इथेच असणार आहे...
पण माझ्या फोटो कड़े पाहून...
ओठावर हसू आणि डोळ्यात वेदना ठेवणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
विसरले जरी सगले तरीही....
माझी आठवण ठेवून श्वास घेणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
माझ्या आठवणीत जागुन रात्र काढणार...
माझ्या फक्त माझ्या कुशीत शिरण्यासाठी तळमळणार कुणीतरी असाव...

काव्या....

भल्या पहाटे मला सोडून कुठे तूं गेलीस ?
ढगां मागे लपते, मला दिसत कां नाहीस ?
लहान आहेस कां तूं, ढगां मागे लपायला ?
आमच्यात येना कधी, लपंडाव खेळायला !

म्हणतात " तुला आता नवी आई आणणार "
तूच सांग ना आई मजसी, तूं कधी येणार ?
बाबाला विचारले तर उत्तर देत नाही
तूच सांग ना आई त्याला, मला माहीत नाही

नेहेमी मला सोडून, कुठे कुठे जायचीस
दिले जाऊ नसते , सांगून गेली असतीस ?
बाबा म्हणतो रोज रोज तेच नको विचारू
तूच सांगना आई कसे मी मजला सांवरू ?

सुरेश पेठे२६एप्रिल०९

फुंकून पीतो बियर
टून् झाल्यावर
जीभ सुटे मोकाट
मी आरूढ़ ढगांवर

खेकड्यासारखा वाकडा
टून् झाल्यावर
डावं-उजवं सारं एक
चालतो अधांतर

मला म्हणतात बेवडा
टून् झाल्यावर
सारे पीवट पेताड
खुद्द झोक्यावर

फास्ट रिवाईंड सिनेमा
टून् झाल्यावर
प्रश्न करा काहीही
उत्तर माझ्यावर

उद्धार सा-या जगाचा
टून् झाल्यावर
मीच भाई, सारं काही
एका इशा-यावर

BMW, फेरारी
टून् झाल्यावर
रात्र जाते सुपर फास्ट
चंद्र घोड्यावर

तारवटलेले डोळे
शुद्धीत आल्यावर
मेंदू गोटा २५ किलो
फिरतो गरगरगर.....

....रसप....२४ एप्रिल २००९

आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
मलभ मना वरच दूर करून , प्रेमाचा वर्षाव करणार

आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
भाव माझ्या मनाचे ,न सांगताच जो ओळ खनार

आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
ओंजलित घेउन अश्रु माझे , मोती बनुन बरसणार

आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
बंद कली मनाची ज्याच्या सहवासाने खुलनार

आता मी फ़क्त त्याची
फ़क्त त्याची वाट बघणार
प्रेम करतोय ,करत राहील
जो माझ्या नशिबात असणार

-मिनल २६.४.०९

मैत्री असते कशी
मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर होईल जीवन अळणी

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतिल
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कुणी हसले तेव्हा हसलो, कुणी रडले तेव्हा रडलो
मज अलिप्तपणे जगण्याचा, सल्लाही कळला नाही

कुणी मनास रुसवुन गेले, कुणी उगाच फसवून गेले
माझ्या स्वातंत्र्यावरचा मज, हल्लाही कळला नाही

मी प्रवहासह वाहिलो , चाकोरीत अडकून राहिलो
मज आर्त भावनांचा ह्या, कल्लाही कळला नाही

कधी उगाच अडलो नाही, कधी कुणास नडलो नाही
कुणी लुटून मज भरलेला, गल्लाही कळला नाही

मी पूजा सूर्याची केली, मी नमन धरेला केले
मज राम समजला नाही, अल्ला ही कळला नाही
हरवलेल आकाश ( आकाश बिरारी )१४ एप्रिल २००९

मी गीत गात होतो, 'नि:शब्द शांततेचे'
अकर्मण्यता ही 'नि:शब्द शांततेची'
पाहून हाक आली अत्यंत आर्ततेची संघर्षही जीवन आहे अहिंसाही शस्त्र आहे.
युद्ध कर, युद्ध कर, युद्ध कर

मी गीत गात होतो, 'मूक संवेदनेचे'
पलायनता ही 'मूक संवेदनेची'
पाहून हांक आली अंतरी आर्ततेची
सामर्थ्यही जीवन आहे, शब्द ही तलवार आहे
वार कर, वार कर, वार कर

मी गीत गात होतो, 'विश्रब्द भावनांचे'
मूढ़ता ही 'विश्रब्द भावनांची'
पाहून जाग आली अंतरी चेतनान्ची
समर्थही तूच आहे जीवन ही तूच आहे
विजयी भव, विजयी भव, विजयी भव

श्रीकांत कानडे १६ अप्रैल २००९

आज हसवायच म्हणशिल तर..
ते तितकसं सोप्प नाही.
वेदना रुतून राहीली आहे..
कुठे तरी..अशी मिटायची नाही..

आज उसवायच म्हणशिल तर..
ते तितकसं सोप्प नाही.
गाठ पडून गेली आहे.. कधी तरी..
अशी सुटायची नाही.

आज चकवायच म्हणशील तर..
ते तितकस सोप्प नाही.
भास गळून गेला आहे.. केव्हा तरी..
अशी भुलचढायची नाही.

आज उसकवायच म्हणशिल तर..
ते तितकस सोप्प नाही.
वेळ टळून गेली आहे.. कधी तरी..
अशी परतायची नाही.

===================
स्वाती फडणीस ..... १६-०४-२००९

आज हसवायच म्हणशिल तर..

ते तितकसं सोप्प नाही.

वेदना रुतून राहीली आहे..

कुठे तरी..अशी मिटायची नाही..



आज उसवायच म्हणशिल तर..

ते तितकसं सोप्प नाही.

गाठ पडून गेली आहे.. कधी तरी..

अशी सुटायची नाही.



आज चकवायच म्हणशील तर..

ते तितकस सोप्प नाही.

भास गळून गेला आहे.. केव्हा तरी..

अशी भुलचढायची नाही.



आज उसकवायच म्हणशिल तर..

ते तितकस सोप्प नाही.

वेळ टळून गेली आहे.. कधी तरी..

अशी परतायची नाही.



===================

स्वाती फडणीस ..... १६-०४-२००९

मनाचा लगाम जरी,

असे बुद्धीच्या हाती...

बुद्धीस छळत राही,

मन हे महाप्रतापी...

निश्चयाला सिद्धीस,

मन जाऊ देत नाही...

मन, ह्रदयाची मैत्री
बुद्धीची त्याला हरकत
मी सापडले कात्रित
देह सोडून जाइन
म्हणतय मला मझ मन!!
@रजनी.. १८.३.०९ पाचोळी!!!

असून मी नसल्यासारखा,
अश्रुविना मी रडल्यासारखा.

जेंव्हा हसतेस तू मला ज़ुरताना पाहून,
तेंव्हा वाटत,काश असतो मी तुज़यसारखा.

डोळ्यात तुज़या खूप प्रश्ना दडलेले,
नि मी मालाच विचारलेल्या एका प्रश्णासारखा.

नोचले अंगा नि अंगा प्रत्येकानी माज़े.
सांग ना,आता का वागू मी माणसासारखा.

त्या मिराने केले ते प्रेम आज कुठे,
नाही मी मीरा आहे आणि नाही मी कृष्णसारखा.

तू समजू शकणार नाहीस कधीच मला,
पार जाळून ज़ल्यावर मी थोडासा विज़ल्यसारखा.

निशब्द(देव)

एक अनोळखी मुलगा येईल, तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भाळुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्य आहे, तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील....

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखय म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नास मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवनभराच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील....

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण..........एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील....

निशब्द(देव)

मन उदास उदास
होते माझे , तुझवीण
मन व्याकुळ व्याकुळ
होते माझे , तुझवीण
मन अकांत अकांत
करते माझे , तुझवीण
मन हुर हुर
हुरहुरते माझे , तुझवीण
मन ढसा ढसा रडते
अड़ते माझे , तुझवीण
मन एकटे एकटे
असते माझे , तुझवीण
मन बेधुंद बेधुंद
रहाते माझे , तुझवीण
मन क्षण क्षण
तरसते माझे , तुझवीण
====गीत १३/४/०९ ====

संपली शेवटची आश्या
तुझ्या येण्याची
वेळ झालिये आता
माझ्या जाण्याची
एकच इच्छा आता
एकदाच जाणवावी
कदर तुला माझ्या प्रेमाची
आणि थोडी फार जाणीव व्हावी तुला
माझ्या वाट पाहण्याची

gєєт 6/3/09

प्रतेकाच्या मनात एक मस्तानी असते,

अरे हऴु ही गोष्ट फक्त स्वतःशी बोलायची असते.

लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते,

आपली मस्तानी कोनालाच सांगायची नसते.

लोक म्ह्ननतात हा व्याभीचार आहे,

जानुन बुजुन केलेला एक अवीचर आहे,

बोलनारे लोक खोटारडे असतात्.

स्वतः पासुन सुद्धा काही तरी लपवत असतात्,

करतील तरी काय़ सगऴेच बाजीराव नसतात्.

लोक नेहमी असेच वागतात,

बाजीरावाचे प्रेम ग्रेट म्ह्ननतात,

तुमच्या आमच्या चरीत्र्यावर शींतोडे उडवतात्,

येता जता नैतीकतेचे डोस पाजतात्.

प्रतेकाला ठाऊक असतं मस्तानी आपली होनार नाही,

सगळ्यांचेच नशीब काही तेवढे थोर नाही,

तरीही आपली मस्तानी जपायची असते,

मनाच्या कपप्यात खोल खोल दडवायची असते.

आज आता गाव हे सोडू कसा?
राहते जे अंतरी मोडू कसा?
वाहलेल्या भावनांचे नीर झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

खीडाकीला टेकून बसतांना ज़रा
वाहता वारा अडवलेला बरा
सोडला नि:श्वास आता खूप झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

गायचे जे स्वप्न ते गाणे जुने
मोजले मी सप्तकाचे स्वर उणे
सावळ्या नेत्रात माझ्या पूर आले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले..

जे मला घडवायाचे आहे पुन्हा
जे मनी रुजवायाचे आहे पुन्हा
ते जुने संस्कार आता दूर झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

("विंधलेल्या काळजाचे सूर झाले..." ही ओळ माझी नाही. क्षमस्व !!)
: अम्बरीष देशपांडे

रोजचंच रुटीन,
सारी तीच कामं,
तेच ऑफ़िस,
तीच सारीजणं...तरिसुद्धा,
आज दिवस एकटा वाटतोय...

एकटं असलं ना की,
विचारांना तेवढंच फ़ावतं..
न बोलावताही,
येतात आगांतुकासारखे
आणी
घर करून बसतात,
मनात...विचारांच्या ह्या चक्रात असतांनाच
केला त्याला फोन..
"कसा आहेस?आज कुठला शर्ट घातलाय?"मी म्हणाले..
"अगं वेडी का खुळी तू..
सोबतच राहतो ना दिवस-रात्र,मग असं का विचारतेय??"आश्चर्याने तो बोलला..
मी म्हणाले,
"बरं,मग तू सांग मला तुझा आवडीचा तो पिंक ड्रेस मी कधी घातला होता?
"जरा थबकला,बोलताना एक मोठा श्वास,
"नाहि गं आठवत,
बहुतेक कामाच्या नादात विसरलो असेन मी.."
अश्या रोजच्याच कितीतरी साध्या गोष्टी सुद्धा,
एकमेकांच्या एकमेकांना माहित नसतात...

मी बोलले,"विसरलास की वेळच मिळाला नाही बघायला??काल तर मी तो घातलेला...
नवरा-बायको आहोतपण,
कितीसा वेळ देऊ शकतोय आता आपण.."

लग्नाआधी सोबत नव्ह्तो म्हणून,
सहवास कमी वाटायचा...
लग्नानंतर,
कौटुंबिक जवाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता..अश्यात,
सोबत असून सुद्धा,
रोज बघितल्याचं देखील आठवत नाही...
पुढे मुलांमधेच इतके गुंतुन जाणार
कि एकमेकात गुंतायचं भान सुद्धा नाही उरणार...
म्हातारपणी,
सगळी आपल्याच दुखण्यांची ग्लानी..
स्वप्न बघायची तरी कधी,[?]
एकमेकांच्या सहवासाची..
दूर दूर पायी फ़िरतांना,
हाथ हातात घेऊन,
खूप खूप गप्पा मारण्याची..
ह्म्म..
आता तर अश्या स्वप्नांची ही
स्वप्नेच बघते मी...
--अवंती..

येण्यास वेळ नव्हता पाच वर्षे तुमच्याकडे
येतील नेते दारात आता, करुन रस्ते वाकडे

विझल्या साऱ्या मशाली आगही नाही कुठे
उरल्यात फ़क्त पणत्या, उरलेत काही काकडे

पाच वर्षांनी पुन्हा भरणार बाजार आता
आश्वासनांची भीक वाटत येतील ती माकडे

हात जोडुन शरण जा असतात नेते सर्वशक्ती
देव तुमचा हात जोडुन घालील त्यांना साकडे

कळतो व्यवहार त्यांना गणितही असतेच पक्के
प्रेतही मोजेल त्यांचे सरणातली लाकडे

होऊ दे अश्रू पुन्हा
डोळ्यातून तुझ्या रडू दे
ओझरता थेंब तो ओंजळीत
क्षणभर पापण्यात नडू दे..

वाटेत सुखांच्या मी
दुखांना कुरुवाळीत गेलो
अस्तीर त्या धूख्याना
आता तरी गळू दे...

वेडाचे भस्म माथी
होवोनी फकीर हिंडलो
पींड तुझ्या हाताने
झोळीत माझ्या पडू दे....

शेळ्या कोम्बळ्याची झुंज
हर्षे पहिली मे सारी
यातना भोगावयास माझ्या
माझे मलाच लढू दे...

उदयास सुर्य येईल
एक दिवस तो सुजाण
आहुती होऊनी आता
सरणावर एकटाच जळू दे...

भय कोणा नको निशेचे
कोन्डत त्या स्मशाणात
वेली बकूळ फुलांची
थडग्यावर माझ्या दरवळू दे...

ओझरता थेंब तो ओंजळीत
क्षणभर पापण्यात नडू दे...

- अगस्ती (13/04/2009)

एक आवर्त , कधीच न उमगणारे एक सत्य कधीच न उलगडलेले
एक किनारा थांग न सापड़णारा
एक अन्याय कधीच न थांबणारा
एक माणूस सतत लढणारा
एक कोळी सतत झुंज देणारा
एक राधेय स्वत्व अन् अस्तित्व विसरणारा !

प्रसाद जोशी. १४.०४.2009

एक चक्र, अविरत फ़िरणारं,
असंख्य आयामी, हळूच डोकावणारं...एक चक्र....

एक चक्र, माधवाच्या बोटावरचं,
एक चक्र, स्रूष्टीच्या नियमांवरचं,
एक चक्र, समुद्राच्या लाटांवरचं,
एक चक्र, वाहणा-या वा-यावरचं,
आणि एक चक्र, या बेटावरचं.....एक चक्र..

फ़िर-फ़िर फ़िरत राहतं,
पिर-पिर करत राहतं..
चक्राची गती गोल गोल..
विचारांची मूळं, खोल-खोल.. असं एक चक्र..

वाळूत रूतवणं पाय,जमलंच सगळ्यांना,
दगडातही रुतून राहीलं,असं एक चक्र...

हर्षदा विनया..

मी लोकांना सांगतो
"माझं आहे निवडूंगासारखं...
त्याच्यासारखी वेगवेगळी अंगे"

काहीही नसेल तरी....उगवीन मी
पाणी कमी असेल तरी....जगीन मी
कोणाचं लक्ष नसेल तरी....वाढीन मी
दुर असाल तर....हिरवा दिसीन मी
फार जवळ आलात तर....काट्यासारखं बोचीन मी
बोचून घ्यायला तयार असाल तर....जवळ घेईन मी
कुठल्याही परिस्थितीत....रंग बदलणार नाही मी
फुलं माझ्याकडे नसली तरी....हिरवागार राहीन मी
फळं दिली नाहीत तरी....प्रत्येक वाटेवर असीन मी
आणि कोणात नसलो तरी....स्वत:त नक्की असीन मी

Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa


Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa