जिन्नस


  • बेबीकॉर्न (७-८) स्वीट एंड सार असली तर उत्तमच अथवा साधी कॅन्ड

  • कॉर्नफ्लार (अर्धी वाटी)

  • आलं-लसुण पेस्ट (१ चमचा)

  • तिखट (१/२ चमचा)

  • मीठ (चवीनुसार)

  • सिमला मिरची - बारीक चौकोनी चिरून (१ वाटी) - लाल, हिरवी पिवळी अशी छान दिसते

  • १ कांदा बारिक चिरुन

  • मिरच्या - २ (चिरुन)

  • टोमॅटो केचप - जसा आंबटपणा हवा तसे (साधारणतः ३-४ मोठे चमचे)

  • सोया सॉस - २ चमचे

  • तेल

  • कांद्याची पात - बारिक चिरून (सजावटीसाठी)

मार्गदर्शन

१. बेबिकॉर्न्सचे १-१ इंच लांबीचे तुकडे करावे. कॉर्नफ्लार मध्ये आलं-लसुण पेस्ट, मीठ, तिखट घालून पाण्यात कालवावे. हे पीठ भजीच्या पिठासारखे असावे. या मिश्रणात बेबिकॉर्नचे तुकडे बुडवून कुरकुरीत तळून घ्यावे.२. पॅन मध्ये तेल गरम करून चिरलेल्या मिरच्या घालाव्या. कांदा घालून परतावे. सिमला मिरची घालावी. अर्धवट शिजली कि सोया सॉस घालावा. मग टोमॅटो केचअप व मीठ घालावे. थोडेसे पाणी घालून एक उकळी येउ द्यावी. वाढताना कुरकुरीत बेबिकॉर्न्स घालून वाढावे. कांद्याची पात घालून सजवावे.

2 comments

Anonymous said... @ March 2, 2012 at 9:51 PM

hi recipe majhi ahae....
kai ho.. jithun hi recipe chorli... tya sanket-sthalacha aani tya vyakticha naav tari dyaycha ithe.. baki lekhikechi paravanagi ghyavi ashi apeksha tumchyakadun karna chukch nahi ka???
-Chaitrapaalavi

Anonymous said... @ March 2, 2012 at 10:11 PM

ho ata tumhi amchi comment aprove tar karnarch nahi na ya blog war...
chalu dya...
chaitrapaavali(chaitrapaalavi@gmail.com)

Post a Comment