झोपडीत जन्म झाला
झोपडीतच मरणार काय?
डोसक फिरायला लगतय विचार सुधा करवत नाही???
आई बा न लाडा ज़पल
उसचा फडत दीसभर टाकलाय
ईवलिशी भाजी आणि ईवलिशी भाकरी
त्यान पोट माज भरणार काय???

हाताच्या फोडवणी मला जपल
शाळेत मला त्यानी घाट्ल
पोरग पण जाम हुशार निगाल
पण पुढ करणार काय???
बान घेतली मागार
आईन घेतला पुढाकार
दोघांची लागली हुजत
पण त्यान माज भल होणार काय???
शाळेतणे काढला ढकला
बान दिला हातात कोयता
मी भी लागलो जोमान उस वाढायला
पण तेन घर वर निघणार काय???
हातवरच पोट आमच
टेवडच बसेतोय भरत
दुनियेचा नाही पता आम्हा
ज़ोपडीतच सार जीवन जाणार काय???
गरीबाची पोरे कधी शिकणार काय???
आई बा चा पांग ती फेडनार काय???
मोठे कधी ती होणार काय???
डोसक लगतय फिराय विचार सुधा करवत नाही
विजय माळी....

0 comments

Post a Comment