- जाडे पोहे-३ वाट्या
- ओले खोबरे- १ वाटी
- कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- लिंबू चवीनुसार
- साखर लिंबाच्या प्रमाणात
- हिरवी मिरची बारीक चिरून
मार्गदर्शन
जाडे पोहे धुवून घ्यावेत. त्यात ओलेखोबरे, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, लिंबाचा रस, मीठ, साखर सगळे घालायचे. नीट एकत्र मिसळून घ्यायचे आणि गटं स्वाहा करायचे.
टीपा
व्हाईट पोहे हे नाव माझ्या मुलीचे. मी झटपट पोहे म्हणायचे.बनायला झटपट आणि संपतातही पटपट... घाईच्या वेळी पटकन तय्यार होतात. फ़ोडणी आवश्यक नाही. घातली तरी चालते. रंगत वाढते. फोडणी द्यायची असेल तर हिंग-जिरे घालून द्यावी.
0 comments
Post a Comment