|
1 comments
]
काल घरातून माझी जुनी ब्रीफकेस गेली
चोर हि पाहून वरमला असेल
म्हणत असेल आज दरीद्राच्या घरात चोरी झाली
पहिले तर त्यामध्ये काहीच नव्हते आणि
पहिले तर माझी जिंदगी त्या मध्ये साठलेली
एक जुनी जीन्स होती
पायाखाली येऊन येऊन तळव्याजवळ फाटलेली
एक तुझं रेखाचित्र होतं तुला आठवताना मी काढलेलं
कोणाली पटलं नसलं तरी
मला ते तंतोतंत तुझ्या सम भासणारं
मी डोळ्यात बघताच
माझ्याकडे पाहून हसणार
आणि एक हि दिवस विसर पडला तर
नाक मुरडून रुसणार
तू स्वतः कधी बोलली नसशील
येवढ ते चित्र मज सवे बोलायचं
येवढ मात्र नक्की की
त्याला पाहून छातीत काही तरी सलायचं
तू दिलेला पेन हि आज गेला
त्या पेनाने मी किती तरी कविता तुझ्यासाठी लिहिलेल्या
किंवा असं म्हण की त्या पेनाला पाहून मला त्या सुचलेल्या
त्या सोबत गेल तुझं ते एकुलतं एक पत्र
तू रात्री जागून लिहलेलं
तुझ्या प्रेमाने काठोकाठ भरलेलं
कित्येकदा माझ्या छातीला लागून निजलेलं
वाचताना नकळत अश्रूचा थेंब पडून थोडसं भिजलेलं
कधी हि चोरला जाणार नाही असा
तुझ्या आठवणींचा ठेवा मी डोळ्यात भरला आहे
काल आठवणींचे शरीर चोरीस गेले,
काल आठवणींचे शरीर चोरीस गेले,
-- दीपक इंगळे २६/०५/२००९
1 comments
:)
Post a Comment