आज आपण प्रगतीच्या एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत. विज्ञान-तंत्रज्ञानात आज होत असलेल्या प्रगतीचा झंझावात पाहता पुढील दहा वर्षांत आपण कुठे पोहोचू हे
निश्चित सांगता येत नाही. दूरसंचार, वैद्यकशास्त्र, कम्प्युटर सायन्स, खगोलशास्त्र, रॉकेटविज्ञान, आटिर्फिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, जैव-तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान अशी विविध क्षेत्रे आज वायुवेगाने प्रगत होत आहेत.

महाराष्ट्राला १९६०साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. या वषीर् आपला महाराष्ट्र ५०व्या वर्षांत पदार्पण करेल. आज भारतातील एक प्रगत राज्यम्हणून महाराष्ट्राने नाव मिळविले आहे. मुंबईसारखे देशाच्या आथिर्क राजधानीचे शहर, पुण्यासारखे सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर महाराष्ट्राचे वैभव वृद्धिंगत करीत आहेत. भविष्यातील महाराष्ट्र विज्ञान-तंत्रज्ञानाची कास अधिकच घट्ट धरून ठेवेल असे संकेत आज तरी दिसत आहेत
वाढता वाढे...दूरसंचाराचे जाळे
उद्याचे विश्व हे बिनतारी संदेशवहनाचे आहे. ब्रॉडबँड इंटरनेटचे आहे. ऑप्टिकल फायरबरचे आहे. मोबाइल उपकरणांचे आहे. आपली आजची भूक आहे ती अधिकाधिक वेगवान संदेशवहनाची आणि जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी-बँड वापरण्याची. उद्याच्या विश्वात आपण अधिकाधिक 'इंटेलिजन्ट' उपकरणे वापरावर भर देणार आहोत आणि तीसुद्धा पूर्णपणे 'वायरलेस' तंत्रज्ञानावर आधारित.आज महाराष्ट्रातील आयआयटी संस्था, 'आईईई'ची मुंबई-पुणे शाखा, या विषयात संशोधन करीत आहेत. जगात त्यांच्या संशोधनाला मान्यता प्राप्त झालेली आहे. उद्याच्या इंटरनेटचा वेग १,०००,००० बिट्स प्रति सेकंद असणार यात काही शंका उरलेली नाही. 'वाय-मॅक्स'सारखे तंत्रज्ञान आज महाराष्ट्रात मूळ धरीत आहे. उद्या त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होईल. उद्याचे मोबाइल फक्त फोन असणार नाहीत तर ते 'लिटील जिनी' असतील. तुम्ही सांगाल ती कामे ते लीलया करतील. तीही क्षणार्धात...कुठलाही 'बाऊ' न करता.
मायाजाल रोबोटिक्स आणि
व्हर्चुअल रिअॅलिटीचे
आज पुण्याच्या 'एमआयटी'सारख्या संस्था रोबोटिक्सवर जागतिक स्तरावर स्पर्धा घेत आहेत. रोबोटिक्स हा फार व्पापक विषय आहे. त्यात सुमारे २५ उपशाखांचा समावेश होतो. व्हर्चुअल रिअॅलिटी, आटिर्फिशियल इंटेलिजन्स, अँड्रॉईड विज्ञान, कम्प्युटर व्हिजन अशा अनेक प्रकारे रोबोटिक्स आज सर्वसामान्यांच्या जीवनात प्रवेश करीत आहे. मानसिक रोगांवर इलाज, विविध विषयांतील शिक्षण, कारखान्यात उपयोग, दुर्गम भागात संशोधन, लहानांसाठी खेळ, आजी-आजोबांना आधार, अपंग व्यक्तींना मदत अशा शेकडो प्रकारे हे तंत्रज्ञान मानवाला उपयोगी ठरत आहे.मुंबईच्या टीआयएफआर, बीएआरसी आणि आयआयटी संस्था, पुण्याच्या सीडॅक या विषयांत विशेष संशोधन करीत आहेत, ही प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. सुपर कम्प्युटरच्या दुनियेत तर सीडॅकचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे... परम ८०००, परम दशसहस अशा एकापेक्षा एक वरचढ सुपर कम्प्युटर बनवून आणि प्रगत देशांना ते विकून सीडॅकने आपली उच्च पातळी क्रित्येक वेळा सिद्ध केलेली आहे.
रॉकेटविज्ञानात इसोची घोडदौड सर्व जगाने आज मान्य केलेली आहे. येत्या नजीकच्या भविष्यात चंदावर मानव पाठविण्याचे स्वप्न आपण साकार करू यात दुमत नाही... किंबहुना आज प्राथमिक शाळेत शिकणारी आपली मुले उद्याचे अंतराळवीर असतील. इसोच्या रॉकेट्स बांधणीमध्ये महाराष्ट्रातील कित्येक वैज्ञानिकांचा समावेश आहे. टीआयएफआर, बीएआरसीमधील शास्त्रज्ञांची अनेक पथके आज या रॉकेट्सवर काम करीत आहेतयाशिवाय आयुका, एनसीआरएसारख्या मातब्बर संस्था विश्वाची रहस्ये उलगडण्यात मग्न आहेत. पुण्याजवळ खेडद या खेडेगावात जीएमआरटीसारखी जगातील सर्वात मोठी रेडिओ दुबीर्ण आज पूर्णपणे कार्यरत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून कित्येक शास्त्रज्ञ या खेडेगावात राहण्यास येतात! आपापली निरीक्षणे करून मायदेशी परततात. अवकाशातील अत्यंत आश्चर्यकारक अशा कित्येक 'पल्सार' ताऱ्यंाचा शोध या दुबिर्णीमुळे महाराष्ट्रातून लागलेला आहे. भविष्यात अनेक नवे प्रयोग करण्यात येणार आहेत. या 'विश्वमंथना'तून कुठली दिव्य रत्ने आपल्या हाती लागतील हे तो काळच सांगू शकेल
उद्याचा महाराष्ट्र जास्त प्रगल्भ आहे हे निश्चित. विज्ञान-तंत्रज्ञानात तो अग्रेसर असणारच आहे. पण कलेच्या क्षेत्रातही तो तितक्याच ताकदीने प्रगती करेल असे संकेत आहेत.
पराग महाजनी
(लेखक खगोलशास्त्राचे संशोधक आहेत)

0 comments

Post a Comment