|
0
comments
]
तानाजी मालुसरे.
कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती.जेंव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेंव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यानी ते लग्न अर्धे सोडले आणि ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."
ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाणा किल्याचा किल्लेदार एक शूर माणूस होता. त्याच्या सोबतीला हाशमी फौज होती. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता.मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करुन त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले.तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.हे समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". तानाजी मालुसरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.
राज्याभिषेक
शिवाजी महाराजांची राजमुद्रा६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.
दक्षिण दिग्विजय
साहित्यात व कलाकृतींमध्ये
शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, कलाकार, शाहिर यांच्या स्फुर्तीचे स्त्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. केवळ मराठीतच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. यातील बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे. तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतीपर लिखाणे विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती.
0 comments
Post a Comment