मी..


मीच माझ्या शत्रूपरी

आज भासतो आहे

हार माझी पाहूनी

मीच हासतो आहे


माझ्या मनाचे वागणे

विपरीत चाललेले

जिथे जिथे मी हासलो

तेथे उदास तो आहे..


मीच माझ्या शत्रूपरी

आज भासतो आहे...


भास...

तूला पाहतो मी

असे भास होती

मलाही कळेना

कसे भास होती


आता जीव घेतो

तूझा हा दुरावा

प्रिये तूच माझा

जणू श्वास होती..


तूला पाहतो मी, असे भास होती

मलाही कळेना , कसे भास होती...

0 comments

Post a Comment