मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेचा वापर दररोज ६५ ते ७० लाख लोक करत असतात. गदीर्च्या वेळी ताशी ३ लाख ५० हजार लोक रेल्वेगाड्यांतून प्रवास करत असले तरी सध्याची रेल्वेगाड्यांची क्षमता फक्त १ लाख ६० हजार इतकीच आहे. म्हणजेच क्षमतेपेक्षा तब्बल २ लाख प्रवासी जास्त आहेत. रस्त्यांवरही दिवसभरात ४५ लाख प्रवासी नेणाऱ्या बेस्ट बसगाड्या गदीर्च्या वेळी प्रमाणाबाहेर भरलेल्या असतातच, यामुळे, तसेच कमी दराने कर्ज मिळण्याची सोय असल्यामुळे खासगी वाहने सतत वाढत आहेत.एमयूटीपी आणि एमयूआयपी यांच्या अंतर्गत ज्या उपाययोजना अपेक्षित आहेत, त्या प्रत्यक्षात आल्यानंतर गरजेच्या फक्त १० टक्के उपचार होतील. याचाच अर्थ असा की, मुंबईच्या सार्वजनिक परिवहन सेेवेची क्षमता ताशी किमान १ लाख ७० हजार प्रवासी इतकी वाढवली पाहिजे.

मुंबई मेट्रो १४६.५ कि. मी. धावणार आहे. मेट्रोची क्षमता सुरुवातीला ताशी २४ हजार प्रवासी असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ती ताशी ७२ हजार होईल. मुंबई मेट्रो प्रकल्प १६ वर्षांच्या अवधीत पूर्ण करायचा असला तरी सध्याची गती पाहता त्याला सहज २० ते २५ वषेर् लागू शकतील. या प्रकल्पाला सुमारे ६० हजार कोटींहून अधिक भांडवल उभे करणे ही अवघड बाब आहे.
या पार्श्वभूमीवर बीआरटीएस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. केवळ तीन ते पाच वर्षांत प्रत्यक्षात येऊ शकणाऱ्या,२०० कि. मी. लांबीच्या बीआरटीएसवर फक्त ३ हजार कोटी रुपये इतकाच खर्च होईल. या बसमधूनही मोठ्या संख्येने प्रवासी जाऊ शकतात. या सोयीला बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम म्हणजेच बीआरटीएस म्हणतात. अशी बस किती लोकांना घेऊन जाणार हे तिच्या क्षमतेवर व ताशी ती किती फेऱ्या करते यांवर ठरते. बीआरटीएसमध्ये समजा दर मिनिटाला ७० प्रवाशांना नेणारी एक बसगाडी जात असेल, तर याचा अर्थ या वाहतूक व्यवस्थेत ताशी ४ हजार २०० प्रवासी नेण्याची क्षमता असेल. याच गाड्या मिनिटाला तीन केल्या तर प्रवासीसंख्या १२ हजार ६०० वर जाईल. प्रत्येक आटिर्क्युलेटेड आणि बाय-आटिर्क्युलेटेड बस गाडीची क्षमता जवळजवळ १६५ आणि २७० असते. ताशी १८० गाड्या म्हणजे म्हणजे मिनिटाला तीन गाड्या चालत असल्या तर ताशी जवळ जवळ ३० हजार आणि ४८ हजार लोकांना नेण्याची क्षमता बीआरटीएस ठेवते.
डेपिक्टेड मार्ग म्हणजे विशिष्ट मागिर्का. मुंबईचे पूर्व आणि पश्चिम हायवे हे प्रत्येकी पाच मागिर्का असलेले रस्ते आहेत. त्यातील एक मागिर्का म्हणजेच डेपिक्टेड लेन बीआरटीएससाठी राखून ठेवता येईल. हळू चालणाऱ्या आणि वेगाने चालणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या मागिर्केतून चालल्या की रस्त्याचा थ्रुपुट वाढतो, आणि हेच बीआरटीएसचे तत्त्व आहे. मुंबईची गरज आणि उपलब्ध रस्ते पाहता आपण चार रस्त्यांवर ४५ हजार क्षमतेची, पाच रस्त्यांवर ३६ हजार क्षमतेची किंवा दोन रस्त्यांवर ४५ हजार आणि तीन रस्त्यांवर ३० हजार क्षमतेची बीआरटीएस चालवू शकतो. सध्याची लेन कटिंगची समस्याही यामुळे कमी होईल, अपघातही कमी होतील. शहरातील जीवन सुरळीत राहण्यासाठी अशा विविध पर्यायांचा विचार आपल्याला करावाच लागेल.
(लेखक परिवहन विश्लेषक आणि आय.आय.टी. येथे सिव्हिल इंजिनीयरिंग विभागात आहेत.)

0 comments

Post a Comment