बायकोसोबत शॉपिंगला जाणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो... म्हणजे आपापल्या बायकोसोबत. ही गोष्ट कोणीही नाकारु शकणार नाही विशेशत: जर त्यांच्या बायकांसमोर विचारलं तर...
मी आणि माझी पत्नी एकदा शॉपिंगसाठी गेलो होतो. जसंकी नेहमी होतं ती पुढे चालत होती आणि मी आपला मागे मागे... काही घेण्यासारखं आहेका ते बघत होतो. एका दुकानावर लावलेल्या एका जाहिरातीने माझं लक्ष आकर्षित केलं.
लिहिलं होतं, " लसून शिलण्याचं यंत्र .... फक्त दहा रुपए'. "यंत्र' या शब्दाने माझी उत्सुकता चाळवली गेली ... तसे तर आजकल कोणत्याही गोष्टीचे यंत्र मिळतात ... मी दुकानदाराजवळ गेलो... त्याला मी ते "यंत्र' दाखवायला सांगितलं... पाहतो तर एक 6 इंच लांब आणि 3 इंच परिघ असलेली ती एक रबराची ट्यूब होती. मी ती उलटून पुलटून पाहू लागलो... खरं म्हणजे मी ते यंत्र सुरु करण्याचं बटन शोधत होतो.
"काय मुर्ख माणूस आहे ... ' या अविर्भावात पाहत त्या दुकानदाराने ती ट्यूब माझ्या हातातून हिसकून घेतली आणि तो दुकानदार त्या यंत्राचं प्रात्याक्षिक मला दाखवू लागला. त्याने एक लसुन ट्यूबमध्ये घातला आणि तो त्या ट्यूबला जोरजोराने रगडायला लागला. जर इतक्या जोरात रगडलं तर सालं तो लसून शिलायच्या ऐवजी आपले हातच शिलल्या जायचे. आणि इतक्या जोरात ती ट्यूब रगडण्याच्या ऐवजी जर सरळ तो लसूनच रगडला तर इतक्या वेळात कमीत कमी अर्धा किलो लसून शिलल्या जायचा. आता "काय मुर्ख माणूस आहे ......' या अविर्भावात पाहण्याची माझी पाळी होती.
ऐवढ्यात " अहो बघा तर ... कानातले झुमके ... कसे वाटतात ' बाजूच्याच दूकानातून माझी पत्नी म्हणाली. मी तिथे गेलो. मी आता थोडा सतर्क झालो होतो कारण आता त्या दुकानदाराच्या मार्केटिंग स्कीलच्या ऐवजी माझ्या मार्केटिंग स्कीलची खरी कसोटी होती. मी त्या दुकानदाराला किंमत विचारली.
" दोनशे रुपए ... तुम्ही आहे म्हणून दिडशेत देवू ' तो म्हणाला.
" तुम्ही आहे म्हणून ...' मी त्याच्याकडे निरखुन बघितले. मी त्याला ओळखत नव्हतो. कदाचीत तो मला ओळखत असावा....
त्याने माझ्या मनातलं व्दंद्व जाणलं असावं.
" मागच्या वेळीसुध्दा मी तुमच्याकडून जास्त पैसे घेतले नव्हते. ' त्याने म्हटले.
तो मला किती ओळखतो हे मला समजले होते - कारण मी पहिल्यांदाच त्याच्या दुकानात जात होतो.
पण त्याने ती गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने सांगीतली की त्याला काही म्हणण्याच्या ऐवजी मीच आपल्या मनाची समजूत घातली की कदाचीत चूकीने तो आपल्याला दूसरंच कुणीतरी समजत असावा. तशी ते झुमके विकत घेण्याची माझी बिलकूल इच्छा नव्हती. आतापर्यंतच्या अनुभवातून मी माझ्या पत्नीची मानसीकता चांगल्या तऱ्हेने समजून चूकलो होतो. मी जर झुमक्यांना खराब म्हटले तर ती ते नक्की घेणार. म्हणून मी म्हटले " खुप चांगले आहेत... तुला शोभून दिसतील'
" ठीक आहे ... माझ्या बहिणीसाठीसुद्धा एक जोडी पॅक करुन द्या' तीने मला पैसे देण्याचा इशारा करीत दुकानदाराला म्हटले.
आता करण्यासारखं काही शिल्लक राहालं नव्हतं. चुपचाप पैसे काढून मी त्या दुकानदाराच्या हातावर ठेवले. कदाचित माझ्या पत्नीची मानसिकता ओळखण्यात मी उशीर लावला होता. तिची मानसीकता ओळखण्याच्या आधी तिनेच माझी मानसीकता ओळखली होती.
... क्रमश:...
|
0
comments
]
0 comments
Post a Comment