एक लहानसा ससा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी
एका कोल्ह्याला बसलेले पाहिले,तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे.
त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.
, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले.
हे काही बरे नाही असे त्याला वाटले.थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले
आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले.ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर
झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.
मरता ससा म्हणाला,
तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.
तात्पर्य -एकमेकांशी सतत भांडणार्‍या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.

0 comments

Post a Comment