एका धनगरास एक लांडग्याचे पिल्लू सापडले. तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबर ठेवले.
धनगराची मेंढरं चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिलू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवीत होते.
परंतु, ते काम झाल्यावर मात्र ते स्वतःच एखाद्या चुकार मेंढराला बाजूला नेऊन, मारून खात असे.
बर्‍याच दिवसांनी ही गोष्ट एकदा धनगराच्या लक्षात आली व त्याने त्यास झाडाला टांगून मारून टाकले.

तात्पर्य - प्राण्यांचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही.

0 comments

Post a Comment