एका अतिशय भुकेलेल्या डोमकावळ्याने, एका सापाला झडप घालून पकडले आणि आता त्याला मारून खाणार,
तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेटोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा प्राण घेतला.
तेव्हा तो डोमकावळा म्हणाला, 'दुसर्‍यांना मारून स्वतःची भूक शांत करणार्‍याला हीच शिक्षा योग्य आहे.

तात्पर्य - जो पदार्थ आपणास मिळणे शक्य नाही तो मिळविण्याचा प्रयत्‍न करणे म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणे होय.

0 comments

Post a Comment