एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले.
तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे.
म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्‍याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले,
'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?
सांगितले, 'मी मुंबईचा?'<
पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे'
आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले,
'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'
मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले.
त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.

तात्पर्य - खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच.

0 comments

Post a Comment