"खरं" माणूस होऊन बघावं….
आज म्हणलं "खरं" माणूस होऊन बघावं
दुसर्‍यांच्या दु:खाला समजून बघावं

कुणी वेदनेत दिसलं तर थांबून वीचारावं
दोन शब्दा प्रेमाचे अन् मायेचं मलम लावावं

कुणी दिसलं गरजू तर मदतीला जावं
आपला घास देऊन भुकेल्याचं पोट भरावं

कुणी दिसलं लाचार तर दुर्गेच रूप घ्यावं
वाट भरकटलेल्यांसाठी डोळ्यातील अंजन व्हावं

एखाद्या अनाथासाठी प्रेमाचा साथी व्हावं
म्हातार्‍या दुबळ्यांसाठी अधाराची काठी व्हावं

सगळे जण म्हणत फिरतात आम्ही माणूस माणूस
माणूसकीला शोभेल असं काय करतात कुणास ठाऊक

तुम्ही पण एक दिवस "खरं" माणूस होऊन जगा
शोधत असलेले सुख समाधान मिळतय की नाही बघा

0 comments

Post a Comment