एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यात उच्च तंत्रज्ञान घेऊन आलेल्या एका इंजिनीयरची नेमणूक केली.
त्याने आल्यावर महिन्याभरातच सार्‍या मशिन्स ठाकठीक केल्या. मशिन्सची काळजी कशी घ्यायची
याचेही प्रशिक्षण त्याने कामगारांना दिले. दोन - तीन महिने झाले. त्याला काही कामच नव्हते. तो
मालकाला भेटला. म्हणाला, सर ! मला तुम्ही मला फुकट पगार का देता ? सर्व मशिन्स
व्यवस्थित सुरु आहेत. आता मी नसलो, तरी कारखाना ठिक चालेल. मालक म्हणाले, ते सर्व ठिक
आहे. आज कारखान्यातली यंत्रं व्यवस्थित आहेत पण उद्या यातलं एखादं जरी मशिन बिघडलं, तरी
माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्यावेळी मी तुला कुठे शोधू ? म्हणूनच उद्या बिघडणार्‍या
मशिन्सच्या दुरुस्तीसाठी मी तुझी आजच व्यवस्था करुन ठेवली आहे. मी काय मूर्ख आहे, तुला
पैसा फुकट द्यायला

0 comments

Post a Comment