मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
आपल्या दोघांची तीपहीलीच भेट..
तु केसात माळलेल्या
गुलाबाच्या फुलाच ते देठ..

आपल्या दोघांच ते
तासन तास गप्पा मारण...
विषय संपलेला असतांनाही
त्याच्यावरतीच ते कीस पाडण...

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
तु पाडव्याला नेसलेली
ती नऊवारी साडी...
तिथेच तु तुझ्या खिडकीत,
ऊभारलेली ती साखरेची गुढी..

तुझ्या-माझ्यात झालेल
ते पहीलच भांडण...
तुझा राग जाण्यासाठी तुझ्या हाताच
मी घेतलेल ते वरवरच चुंबन...

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
चेह-यावरच तुझ तेअलगद लाजुन हसण..
आणि लाजता लाजताच हळुचते माझ्याकडे बघण....
ते माझ्याकडे बघण....

आपली शेवटची
ती संध्याकाळ...
आपण दोघोच होतो फ़क्त
आणि पुढे तो भयंकर काळ...

कांचाचा ढीग, रक्त्ताचा सडा, तुझी शेवटची आरोळी...
संपलच सगळ एका क्षणार्धात...
मी मात्र वाचलो त्या अपघातात,तुला मात्र दोन महीने झाले आता..
तशीच निपचित पडुन आहेस तु आयसीयुतल्या त्या खाटेवरती...

म्हणुनच... ऎक ग.. तु जरा माझ..
ऊघडशील ना..... तु तुझे डोळे??
कारण.... एकदाच....
मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय.


0 comments

Post a Comment