काही गोष्टिंच असच असत
मनात अठवनिंच जाळ असत
त्यात काहींना विसरायच असत
पण विसरण मात्र जमत नसत
आमच्या आयुष्यातून त्यांना जायचच असत
आणि त्यांच्या आठवणीना आम्हाला छळआयाच असत
अठवनिंच कस असत
रात्रि लुकलुकनाऱ्या ताऱ्यासारखं असत
लांब असले तरी पण मनात जवळच स्थान असत
अठवनिंच कस असत
पावसाच्या टोचनाऱ्या थेम्बानसारख असत
भिजन आपण सोडत नाही कारण टोचन ही आपल्याला हवहवसच असत
आठवणीना चित्रात रेखाटायच असत
तर कधी कवितेत कोरयाच असत
गर्दी मध्ये एकट्या जगनाऱ्या माझ्यासाठी
हे नातं अधाराचच असत
अठवनिंच महत्व तुम्हाला काय कळनार
त्यांना विचारा
ज्यांना आठवणीच्या आधारावर
आयुष्यभर जगायच असत
|
0
comments
]
0 comments
Post a Comment