ते क्षण आठव एकदातरी
भेटलो होतो आपण पहिल्यांदा
बोललो होतो आपण दोघे छान
त्या वेळीही अन् नंतरही कितींदा
ते क्षण आठव एकदातरी
पाण्यात पाय टाकुन किती वेळ
बसलो होतो आपण किनाऱ्याला
त्या वेळीही अन् नंतरही कितींदा
ते क्षण आठव एकदातरी
रेतीत नाव कोरले पहिल्यांदा
बसलो होतो त्याकड़े पाहत
त्या वेळीही अन् नंतरही कितींदा
ते क्षण आठव एकदातरी
हातात हात गुम्फ़ले होते पहिल्यांदा
सुकावलो होतो फ़क्त सोबतीने
त्या वेळीही अन् नंतरही कितींदा
स्मिता
|
0
comments
]
0 comments
Post a Comment