मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी मलाच हरवून बसलो
हात तुझा हातातून सुटताना
एक आधार गमावून बसलो
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तसं मी मनातही आणलं नव्हतं
वाटलं तू तरी ओळखशील मला
माझं दु:ख कोणीचं जाणलं नव्हतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुझा आरोप मला मान्य नाही
परीस्थितीने दगा दिला, नाहीतर
माझं प्रेम इतकं सामान्य नाही
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी इतका नाही गं अर्धवट
तुझं आयुष्य पुढे सुखी व्हावं
म्हणून केली ती सारी खटपट
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
एकनिष्ट मलाही रहायच होतं
पण नीयतीला कुठे आपल्याला
असं फुललेलं पहायच होतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुला दु:खां पासून दूर नेलेलं
पुढच्याच वळणावर
मी मलाच उद्धवस्त केलेलं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
परीस्थितीच अस्पृश्य होती
तुझ्या माझ्या मिलनाची
हातावरची रेषाच अदृश्य होती
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
नात्यात कधीच बहर नव्हता
एकमेकांसाठी तळमळण्याची
भावनेत कधीच कहर नव्हता
@सनिल
|
0
comments
]
0 comments
Post a Comment