आमची कौलारू चाळ
आणि स्वयंपाक घरातच मोरी.
शेजारच्या घरातले वास फ़टींवाटे इथे यायचे.
जीभेला पाणी सुटायचं
कुणालदादाचं लग्न झालं तेव्हा तर घमघमाट.
मी त्यांच्या घरात रेंगाळायचो.

मोरीही स्वयंपाक घरातच.
ताई आंघॊळ करताना दार लावायची स्वयंपाक घराचं.
पण मी मात्र तसाच करायचो.
ताईला काय लाजायचं ?
पपा तर असून नसून ...
ताई सकाळच्या शाळेला जायची म्हणुन आधी आंघॊळ तिची
मग मी.

एकदा ताई घरात नव्हती म्हणून
दांडीवरचा टॉवेल काढायला
कठड्यावर चढलो
आणि चुकुन पलिकडे लक्ष गेलं
तर पलिकडे कोमल वहिनी आंघॊळ करत होती
मी लगेच खाली उतरलो
ज्याम थर्थरत होतो
सगळं अंग कांपत होतं
आणि कानशिलं गर्म गरम
वीज गेल्यासारखं झालं
मानेखालून सर्रकन
नको म्हटलं तरी डोळ्यांसमोर तेच दृश्य.
तेच ते दृश्य...

शाळेत सुद्धा तेच दृश्य.
सुजयने बरोब्बर हेरलं
तसं अभ्यासात लक्ष नसायचंच आमचं कधीच
पण त्यादिवशी टिवल्याबावल्यांत पण रस नव्हता.
त्याला सांगितलं नाही
पण धडधड तशीच दिवसभर.
आपण काही चूक केलंय, काही नको करू असं.
पण दुसर्‍या दिवसापासून आपोआप पाय कठड्या कडे
एखाद्या दारुड्यासारखे
स्वयंपाकघराला कडी लावू लागलो
पण पुन्हा काही दिसलं नाही...
पण तरीही
नुस्तं फ़टी तून पहाताना गोडशी धड धड व्हायची
हवी हवीशी वेदना
कळतच नसे...
कधी कोमल वहिनी घरात काम करताना दिसे
तशी मी तिला नेहमीच पाहायचो
पण फ़टीतून पहाण्याचा काही वेगळाच
सुखमय अनुभव
धडधड , भिती आणि सुख असं विचित्र मिश्रण.

आणि एक दिवस लवकरच
मी असा फ़टीला डोळा लावून असताना
कडी लावायची राहिली
पायाच्या पोटरीवर फ़टका बसला तसा कळवळलो
ताईच्या हातात पळि होती
आणि डोळ्यांत अंगार
सपासप सपासप फ़टके मारत सुटली...

मला कळेचना
भिती
मार
मला तर रडायचीही चोरी. शेजारी येतील ना ...
कळवळत हुंदके देत होतो
आणि ताई तर बेभान

अखेर ताईच थकली
आणि रडायला लागली...

" अरे मी इतरांना राक्षस म्हणते रे,
सगळे माझ्या पाळतीवर
पण तू सुद्धा त्यांच्यातलाच निघावास ?"

ताई,
मी वचन नाही दिलं काही
पण
पुन्हा कधीच असं काही केलं नाही गं.
तुझं दुसरं रडणं तरी कामी आलं.
-टल्ली

0 comments

Post a Comment