सकाळच्या किरणानी
तिला न्हालेल पहायचय,
केसातून घरन्गळणाऱ्या
बिन्दूना झेलू पहायचय।
केस् मोकळे सोड्लेल्या तिला
गोऱ्यापान् पठिवर
उन झेलताना पहायचय।
तिच्या ओठावरच हसू
दुरुनच प्यायचय,
पापण्याच्या झुल्यावर
खूप-खूप झुलायचय।
फ़क्त एकदाच.....
तिच्या समोर मला
सार् मोकळ करायचय,
ति भिजो वा ना भिजो
मनसोक्त बरसायचय
मनसोक्त बरसायचय......
|
0
comments
]
0 comments
Post a Comment