इथे स्पर्श चांदण्यांचा मला पोळलेला
असा शब्द हा विषारी मधी घोळलेला
जगास पर्वा दिमाखातल्या काजव्यांची
जरी आमुचा असे सु्र्य झाकोळलेला
कळे न कुणा म्हणावे सखा जीवनाचा
पुन्हा एकदा स्मरे तु गळा घोटलेला
कुठे तुज आठवे ताटवा तो गुलाबी?
कुणा शब्द आठवे का कधी बोललेला?
उभा जन्म वेचला, भेटला न 'मुरारी'
जुना अपराध तो का पुन्हा भोवलेला?
- 'सकाळ' नितिनकुमार चोभे
|
0
comments
]
0 comments
Post a Comment