दोस्ता असेल जर,थोडा वेळ तर,बोलू काही

शब्दांच्या या खेळानंतर, बोलू काही



उगी भांडणे, तप्त चांदणे, अबोल दुखणे

खुल्या दिलाने मिटवून अंतर, बोलू काही



तुझाच भास अन तुझाच ध्यास, अजाण त्रास

गुपीत याचे कळल्यानंतर, बोलू काही



क्षणात सागर, क्षणात घागर, कधी हे निर्झर

अवखळ मनीचे विचार सुंदर, बोलू काही



दुजा सांगणे, स्वतः पहाणे, फ़ुका बहाणे

घेउनी क्रुत्यातून प्रत्यंतर, बोलू काही



अनुभवांची, सुखदुःखांची, रंगपंचमी

रंगून होण्या मस्त कलंदर, बोलू काही



-प्रणव

0 comments

Post a Comment