आज ना ते मोकळं रान आहे

ना झाडावरलं ते शेवटचं पान आहे

एक झुळुक आत्ताच येऊन गेली

माझ्यातली उरली सुरली ओल पिऊन गेली



सुका जीव म्रूगजळामागे धावतो

धावतानाही किती डगमगतो, तडफडतो

एक शिकार तेव्हाच मरता मरता

आकाशात शेवटचे पंख फडफडतो



म्रूगजळाच्या ठिकाणी माझं प्रेत आहे

मातीतला रक्ताचा थेंब...जिवाचा आखरी संकेत आहे

आता नक्की पाऊस येईल, सर्व काही धूवुन जाईल

पुन्हा एक नवं पाऊल, कदाचित माझ्यावरंच छापुन जाईल



-अस्मित

0 comments

Post a Comment