सुख दुःखाचे फेरे चुकवण्यासाठी
आपण राहावे जन्म भरचे योगी ,
जगताना फक्त सुखाची अपेक्षा करणारे
आपण सर्वच असतो अगदी वेडे भोगी .......
ईशान .
मी संत नसे, न वैरागी
प्रपंचाचा, एक भोगी..
लुटण्या आनंद सुखाचा
मनुष्य मात्र, न मी योगी..
-- संदेश
फुलाचे उमलणे कसे ,
नेहमीच नित्य नवे असते
तसे तुला माझ्याकडे येण्यास ,
काही न काही कारण हवे असते ...
मोगर्याच्या गजरा मला
तूझ्या ओंजळीत टाकायचाय...
नक्कि गंधाळते कोण?
हेच मला पहायचय..
-
मंदार
आजकाल माझे मन सतत ,
तुझेच चित्र साकारते
त्या चित्रात आपले भविष्य,
रेखाटायला मात्र ते अजून नाकारते ........
ईशान
निवडुंग तर नेहमी आशेवर असते..
त्यालाही कधी कधी जास्त पाण्याची गरज असते..
पाण्याविना जगताना तेही मनात रडत असते..
आणि मग तेच पाणी पिऊन आपले पोट भारत असते..
-प्राग..
आयुष्याच्या वाटेवर साथ तुझी असावी..जीवन-भरासाठी तुच माझी असावी..
तुझे ते प्रेम आणि तुझी ती काळजी, हे सर्व काही असावे फ़क्त माझ्याच साठी..
तुझा तो कोमल चेहरा मला पाहुन फुलावा,
आणि हातात हात घेउन सगळीकडे मिरवावा..
लाजत लाजत मिठीत माझ्या हळूच तु यावे..
आणि डोळ्यात तुझ्या बघता बघता मी बेहोश व्हावे..
तुझे ते गोड हसने मलाही हसवते..मात्र तु दुखात असताना मलाही रडावते..
तुझी नशीली नज़र घायल मला करते..
एक झलक पाहण्या साठी पुन्हा पुन्हा लवते..
तुझा तो बेभान स्पर्श हृदयाला भिडतो..
तुझ्या सहवासात मी स्वर्गच अनुभवतो..
झ्या आठवनीत माझा जीवच व्याकुल होतो..डोळे येतात भरून आणि श्वासच थांबतो...
तुझ्या विरहाची कल्पना मी करुच शकत नाही..
कारण!!!
तुझ्या शिवाय मी जगुच शकत नाही...
सोडुन मला एकटे जेव्हा तु जाशील..या शरीरातून प्राण तु नेशील..
पण जेव्हा आठवतील तुला सुखाचे ते दिवस,
मी नसेल सोबतीला आणि तु पण एकटी होशील....
महेश...
अंगणातल्या रातराणीला ...
फूलणे तसे नेहमीचे
निवडुंग माझा फुलला आणि ..
सांगून गेला बरेचसे ...
माणुस एकटाच जन्मतो अणि एकटाच मारतो,
कितीही प्रेम केल कुणी तरी बरोबर येत नस्त,
जर अस होत असत तर कसलीच नस्ती खंत,
आणि कधीच नस्ता एकांत. एकांत आणि फ़क्त एकांत.
मी नाही भेटलो तिला की ती भलतीच तापते
"मी कधी भेटनारच नाही तुला" म्हणते
पण समोर आल्यावर मात्र गालातल्या गलत हसते
कारण प्रेम तर ती सगळ्यात जास्त माझ्यावरच करते
मी नाही केला तिला call तर ती भडकते
"मी कधी बोलणारच तुझ्याशी" म्हणते
पण call च्या माझ्या चातक सारखी वाट पाहते
कारण प्रेम तर ती सगळ्यात जास्त माझ्यावरच करते
मी नाही केल chat तिच्याशी की ती संतापते
"मी online च येणार नाही" म्हणते
पण मधूनच online येऊन माझ status check करते
कारण प्रेम तर ती सगळ्यात जास्त माझ्यावरच करते
मी नाही केल मनासारख तिच्या की ती वैतागते
"दुसरी मुलगी बघ लग्नासाठी" म्हणते
"पण दीवाळीत साखरपुडा नि Feb
मध्ये लग्न अस आवर्जून सांगते"
कारण प्रेम तर ती सगळ्यात जास्त माझ्यावरच करते
-------संजीव
२६/०८/०९
तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
भीती नाही वाटली अंधाराची
अन अंधारात चालताना देखिल
ओढ़ होती प्रकाशाची.......
तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
पावलो पावली मिळाला विश्वास
अन मिळाला धीर संकटात .....
तुझी-माझी मैत्री बनली
एक फुलांचा नाजुक वेल
म्हणुन आपल्या मैत्रीचा
आहे अनोखा खेल......
पण तू हाथ धरलास
नि जिव माझा खुलुन आला
माझ्या आयुष्याच्या वृक्षावर
जणू गुलमोहरच खुलुन आला......
तूच शिखवलीस मला
जगण्याची खरी कला
म्हनुनच तुझ्या-माझ्या मैत्री साठी
लाख सलाम तुला.......
Manoti bhingarde
कोणी बघेल म्हणुन तू मला
स्वप्नात पत्र लिह्तोस
आणि पहाट होताच पत्रासहित
हसून निरोप घेतोस.....
मग..?
मग, माझ्या भावनांची नदी
मनातून ओसंडून वाहते
आणि.......
दिवस-दिवस मी तुझ्या
पत्रांची वाट पाहते......!!!
Manoti bhingarde 27.08.09
स्वप्नामाधे तुज्यासोबत
समुद्रावर फिरण होत
रोज मात्र तुझ्या विचारात
फ़क्त माझ झुरण होत.........
म्हणुनच....,
तुझ्या आठवणीनपेक्षा
मला तुझ स्वप्नच
खरतर बर वाटत
निदान....,
तू माझ्या बरोबर आहेस हे
काहि काळ तरी खर वाटत.............
Manoti bhingarde 27.08.09
इंद्र नाराज होता, रंभा तर फारच चिडलेली
एकंदरीत चित्र चिंताग्रस्त
माझ्या कर्मकांडाची फ़ाईल स्वर्गात हि रखडलेली
इंद्र म्हणाला प्रेम करायचा प्रेम करायचा
म्हणून तू तिच्यावर किती रे प्रेम करायचा
तुला प्रेम वाटता वाटता
माझ्या प्रेमाचा स्टोक मलाच कमी पडायचा
ती तुझ्याकडे ढुंकून हि पाहत नसली तरी
तू तिच्यासाठी रात्रं-दिवस झुरायचास
तिने पायाने लवंडली तरी
प्रेमाची घागर तू परत काठोकाठ भरायचास
तिने तुझ्याकडे पाहिलं नसलं तरी
हि रंभा तुझ्या प्रेमाच दररोज live telecast पहायची
दयेलाही दया येईल असे तुझे प्रेम पाहून
हि रंभा ढसा ढसा रडायची
सौंदर्य नको अमरत्व नको
मी तुझ्या सारखा प्रेम करेल असा वरदान मागायची
शिका जरा त्याच्याकडून
असा वरून मलाच गाल फुगवून सांगायची
येवढ माझा नाव घेतला असतास तर
मी हि तुला पावलो असतो
तुझ्या प्रत्येक संकटात मदतीला
स्वताहून धावलो असतो
येऊ दे तिला वर एकदा
सरळ तिला नरकातच पाठवतो
बघतोच मग तिला
तू कसा नाही आठवतो
तसा म्हणताच बोललो
म्हणालो ती नरकात जाणार असेल
तर मलाही तिथेच पाठवशील
नरक हि मला तिथे स्वर्गाहून सुंदर भासेल
का म्हणून तिने
माझ्याकडे यायचं
तहानलेल्याने पाण्याकडे
का पाण्याने तहानालेल्याकडे जायचं ?
मी साधारण मनुष्य, ती रुपाची राणी
मी साचलेलं पाण्याचं डबकं, ती झुळझुळ पाणी
मी खोबरेल तेल, ती अत्तरदाणी
मी हिमेश चा ऊऊऊऊ, ती लताची गाणी
मी खुरटे केस, ती लांब सडक वेणी
मी आरे च दुध, ती शुध्द लोणी
असा बोलताच इंद्राने चक्क हात जोडले
सकाळच्या पहिल्या गाडीने परत पृथ्वीतलावर धाडले
म्हणाला माझ्या संसाराला आग लावायचा तुझं काही तरी कपट आहे
सांगून सुधारणार नाही असा तू कुत्र्याचा शेपूट आहे
तू साधारण असलास तरी
तरी तुझं प्रेम असाधारण आहे
तिन्ही जगावर मात करेल
असा तुझ्याकडे कारण आहे
–
दीप २१/०८/२००९
डोळ्यात पाणी सुकवून टाकेल बघून तुला....
पण तुझ्यासमोर रडणार नाही ती
तुझ्यासाठी जगाशीही आता कधी लढणार नाही ती..
आता तू तो नाही न राहिलास....
मग ती हि ती नाही राहणार...
सोबतीला तुझ्या कधीच आता दिसणार नाही ती....
मागशील साथ जेव्हा लागेल गरज...
पण मायेने हात कधी हाती धरणार नाही ती..
धरलेला हात सोडून द्यायचास ना...
सुखात आपल्या विसरून जायचास ना
आता विसरायला...
आठवणीचतच नाही राहणार ती..
निघून जाईल अशी कि...
दूर गेल्यावर दिसेल...
पाठमोरी.....
गरज वाटेल सोबत भासेल...
पण हात नसेल...
बोल्याच असेल खूप काही..
पण ऐकायला कोणाला वेळ नसेल...
रडशील परत ये म्हणशील...
पण आता कधीच तुझ्यासाठी परत येणार नाही ती..
कधीच नाही...
गहिरे क्षण मनाच्या कोपऱ्यात..
तरळले पाणी तुझ्या डोळ्यात..
असे कसे आभाळाचे रितेपण..
होऊ दे मोकळे तुझे मन..
मनातून एक साद येई..
मला तुझी आठवण येई..
तुझे डोळे आस पाही..
क्षण क्षण मी जवळ येई..
अशीच प्रीत असते खुळी..
कसे उतरवू तुझ्या गळी..
गुंतून पडतो डोळ्यांच्या गहिराइत
शोधतो तेच क्षण त्याच मातीत..!!
-प्राग..
26/08/09
एक होता विदुषक
अगदी माझ्या सारखा
नेहमी सर्वांना हसवायचा
हसवणे त्याची कलाच होती
हास्याचा जणू तो निर्माता होता..
:
हसण्यात मग्न असायचे सर्व
इतरांना ते समजत नव्हते
हसवताना तो स्वतः मात्र
खोल विचारात हरवून जायचा
त्याची होणारी ती अवस्था
माझ्या पेक्षा वेगळी नव्हती...
:
हसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात
तो फक्त तिलाच शोधायचा
लपलेली असायची ती कुठेतरी
त्याला दिसायची सुद्धा ती हसताना
शेवटी तो त्याचा भासच असायचा
क्षणात ती अदृश्य व्हायची...
:
ती आपली कधीच होऊ शकत नाही
याची पुर्णतः जाणीव त्याला होतीच
त्याला याचे वाईट सुद्धा वाटायचे
तरी तो तिच्या वरच प्रेम करत राहिला
कदाचिद यालाच खरे प्रेम म्हणतात...
:
पण काय ते म्हणतात ना प्रेमा बद्दल..
खरे असेल तर ते एकदाच होते आयुष्यात
असेच काहीसे त्याचे नि माझे सुद्धा...
:
--हरिष मांडवकर
१८-०८-२००९
सुख-दुखाचा खेल जीवनभर चालणार....
सुखा बरोबर दुखही साजरे करा....
व्हा राजे खेलाचे...
दुखालाही नमते करा....
खूपते ही अशी भेट
बोचतो हा वारा भरारा
सये तूझा थंड अबोला
ग पेटवी रान सारा ..
निशब्द चांद नभीचा,
का बेभान चाफ़ा झाला
रूपड्यास म्हणे तूझ्या ग,
त्यांचाच रंग आला
प्रीये सोड ना अबोला
बघ फ़ुलेना गूलाब वेडा
रागवशी तू अशी का
चालेना काळजाचा ठोका
जाम ही झाला बावरा
प्यालाशी तो का भांडला
आस तव स्पर्शाची त्यास
बघ ओठांवरी तो थांबला
मंदार(साद मनाची)
२६-०८-०९
किती जण आपल्या नशिबाला दोष देतात
कर्तुत्वा कडे स्वतःच्या किती जण पाहतात?
अमिताभच्या घरात जन्मलो असतो ,तर अभिषेक झालो असतो
पण याच देशात खानांचा शाहरुख पण राहतो
गावाला जातांना आपण त्याच गावच ticket घेतो
आयुष्याची गाडी आपण बिना destination सोडून देतो ||goal||
सुंदर पोरगी,सुंदर ड्रेस चपला खराब एवढाच पाहतात
इतके गुण असताना आपल्याला दुर्गुणच का दिसतात? ||attitude||
बद्कान मध्ये राहून गरुड स्वतःला बदक समजतात
सगळ काही ठरते तुम्ही स्वतः स्वतःला काय समजता? ||self esteem||
कोवळ्या वयात शारीरिक आकर्षणाला प्रेम समजतात
वाईट मित्रान मूळे दारूच्या सवयी लागतात ||discipline||
नीट वापरा आयुष्यात हे चार तंत्र
हाच आहे "यशाचा गुरुमंत्र"
राजेश जोशी २६\८\२००९
चिरंजीव निहारिका औक्षवंत हो !
माझी सोनू निहारिका | जणू छोटीशी बाहुली |
माझ्या बिरार कुळाची | उमलती सदाफुली || १ ||
माझी सोनू निहारिका | तिचे टपोरे हो डोळे |
आहे मिश्किल जराशी | दावी मुखी भाव भोळे || २ ||
माझी सोनू निहारिका | तिचे छान छान झगे |
राघू, मैना, भू भू, मनी | त्याच्यावरी तिचे सगे || ३ ||
माझी, सोनू निहारिका | तिचा साहेबी रुबाब |
जरासुद्धा न चालतो | थोडा रुमाल ख़राब || ४ ||
माझी सोनू निहारिका | तिचे गुब्बे गुब्बे गाल |
थोड़े जरी रागावता | नाकाचा हो शेंडा लाल || ५ ||
माझी सोनू निहारिका | तिचे सखे चिऊ, काऊ |
मला म्हणे, "त्यांच्या सवे | चला उडायला जाऊ" || ६ ||
माझी सोनू निहारिका | कधी होते माझी बाई |
थोड़े जरी मी चुकता | शिक्षा देई घाई घाई || ७ ||
माझी सोनू निहारिका | जणू तारका चांदणी |
मोठी होता चमकेल | विश्वाच्या या नाभांगणी || ८ ||
माझी सोनू निहारिका | ठेवी हात कटेवरी |
आणि म्हणे, " आई, बाबा | विठू आला तुम्हा घरी," || ९ ||
माझी सोनू निहारिका | करी हाताची बासरी |
पू पू ऐसे म्हणताना | मूर्त पहावी हासरी || १० ||
माझी सोनू निहारिका | कधी खेळते भोंडला |
फेर धरुनी ती म्हणे | "कसा हत्तीला कोंडला || ११ ||
माझी सोनू निहारिका | कधी कधी होते राजा |
बसुनिया माझ्या पाठी | वाजविते बँडबाजा || १२ ||
माझी सोनू निहारिका | किती तिच्या सांगू खोड्या ?
नव्या को-या कागदाच्या | करावया लावी होड्या || १३ ||
माझी सोनू निहारिका | कधी खोटं खोटं रडे |
कङेवरी घेता मात्र | खुदकन हसू पड़े || १४ ||
माझी सोनू निहारिका | ए बी सी डी गिरविते |
दटाऊनी मज म्हणे | "तुम्हांलाही शिकविते" || १५ ||
माझी सोनू निहारिका | कधी स्वतःशीच लाजे |
तिचा नखरा असा की | तिचा तिलाच विराजे || १६ ||
माझी सोनू निहारिका | आहे उत्तम गुणाची |
तुम्ही तरी सांगा बरे | सर येईल कुणाची ? || १७ ||
माझी सोनू निहारिका | राती जेव्हां येई खळी |
माऊलीच्या कुशीमध्ये | झोपी जाते सोनकळी || १८ ||
माझी सोनू निहारिका | गायत्रीचे हे वासरू |
गुणगौरव गाताना | कसे स्वतःला आवरू ? || १९ ||
माझी सोनू निहारिका | तिचे विशाल आकाश |
ज्ञानवंत ऐसी होवो | शत् सुर्याचा प्रकाश || २० ||
रचना : उपेंद्र चिंचोरे
Email : chinchoreupendra@yahoo.com
समस्येचा गाळ पण
ऊन पडल्यावर कडक होतो............
अशाच गाळाची मूर्ती बनवून
एक दर्मिळ मूर्तिकार घडतो............
अभिनंदन
काही गोष्टिंच असच असत
मनात अठवनिंच जाळ असत
त्यात काहींना विसरायच असत
पण विसरण मात्र जमत नसत
आमच्या आयुष्यातून त्यांना जायचच असत
आणि त्यांच्या आठवणीना आम्हाला छळआयाच असत
डोळे ते काळे काळे
ना बाण ना ते भाले
झाल्या जखमा कशा
मला मूळी ना कळाले
बेभान नशीले ते प्याले
कसे मनात उतरू आले
न पीताच चढली नशा
असे जाम ते मज मिळाले
शब्दांशी शब्द ते जुळले
संगीतात वाहते झाले
अनामिक दर्द ल्यालो
गीत मौनातून ते आले
मंदार (साद मनाची)
२६-०८-०९
सागरही आहे खवळला
भीषण वादळ घोंगावते
तरीही , निरंजन तेवते
सखी, सांजवात मी लाविते
लाचाऱ्यागत मदतीची भिक घेणारे....!!
स्वताचाच आक्रोश ऐकून कानावर हात ठेवणारे...!!
जगण्यापेक्षा मरनाच सोप्प जालय म्हननारे आपण
मुंबई स्पिरिटच्या नावाखाली घरून निघताना मुलांच्या तोंडाकड़े शेवटच पाहतोय अस पाहणारे आपण
धन्यवाद सहाव्या मजल्यावर बसलेल्या त्या मंत्र्यांचे
बाकि काही नाही निदान मरण तरी स्वस्त करणारे.....!!
शेवटी पुन्हा असेच जीव जाणार
पुन्हा अश्याच मेन्बत्या जळणार
सोन्याचा धुर निघनाऱ्या या जमिनितुन
आता फ़क्त रक्ताचे पाट मुरनार...!!!!
-----सागर
जणू आयुष्यभराचे ऋण करतोय त्या तोरयाने वाऱ्याला अडवून मंद उजेड ठेऊन ..
चार भिंतीतल्या दार खिडक्या पण दूर निघून गेलेल्या ...
आत आणून तसच टाकून रस्ता सांगण्यास विसरलेल्या ...
या सर्वांमध्ये एकटीच ती....
मुखवट्याचे आणि चेहऱ्याचे आज खरे सत्य कळले ..
पण का ..अजून नाही मनाने या मुखवट्याला नाकारले ...
का अजून मन शोधताय सत्य आणि स्वप्नांची सांगड ...
ठावून असून कि ते सूर्य चंद्रापरी एकत्र येणंच अवघड ...
प्राजक्ता
१०-८-०९
बघ क्षणात निवेल
तव प्रेमाच्या सिंचने
प्रितवेल बहरेल
पुर्वेचि केशरलाली
कशी पसरली गाली
तुझ्या मुग्ध हसण्याने
खूण प्रितीची पटली
------संगीता सावंत कोथरुड , पुणे.
------८८२००९.
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई
येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
- यशवंत
पांढऱ्या रंगाला सौंदर्य असंच प्राप्त होत नसतं ...........
त्यासाठी त्याने पाण्याआड जाऊन इंद्रधनू म्हणून उमटायचा असतं.......
आयुष्य दिलं आहे म्हणून जगायचं नसतं........
आपल्यातलाच आपलं शोधून आयुष्याला घडवायचा असतं.....................
हे लावले तरू माझ्याच अंगणात
वारा ईथेच का वाही उदासवाणा
हासू नका कुणी उपहास भासतो
हे भाव ना खरे मी खुद्द हासताना
....रसप....
०५ ऑगस्ट २००९