माझ्यात लपलेला अस्वस्थ अश्वत्थामा
माझ्या गात्रागात्रावर राज्य करु लागतो
चिरंजीवत्वाची खूण शोधत पेटवत
माझ्यातनामनावर पेरत जातो
एक भयाण अस्यस्थता

माझ अस्तित्व शोधायला लागते मीच मग
घरी दारी माझ्या भोवतालच्या वस्तुत
काही मागमुस नसतो त्याचा
वा-राचाही गंध अपरिचीत येउ लागतो
मी थकते शोधुन शोधुन मझ्याच स्वप्नखुणा

तेलाचा एक कण त्याला हवा असतो
अन मी तोच नाकारते त्याला
माझ्या दु:खाची भळभळती जखम
माझ आसमंत मझ्याच अस्तित्वाच्या
खुणा नाकारत तेह्वा....

तो चिरंजीव आणि मी अस्तित्व्विहीन
दिवस कलतो रात्र अंधारात संपते
सकाळ उमलल्यावर फ़ुंलांचे विध
रंगते"आई किती छान फ़ुल उमल आहे तुझ"
आणि माझ्यातला तो अस्वस्थ तो
शांत होऊन जातो
तेल मिळाल्यावर जखम निवळल्यागत....

सौ.विणा बेलगांवकर....

0 comments

Post a Comment