मीच चन्द्र, सूर्य मीच...
सुर्याला लागलेल ग्रहण मीच...
मीच सुर, ताल मीच,
किंचाल्यांतला ला आक्रंद मीच.
पंख माझेच, आकाश मीच,
तडफडणारा जटायु मीच...
मीच डोंगर, नदी मीच,
उफाळलेला पुर मीच...
मीच ढग, विज मीच...
कोसळणारी आग मीच
आयुष्य मीच अंत मीच,
धडपड़णारा श्वास मीच....
स्वतःलाच मीच सवारनारा, मीच स्वतःला बुडवणारा...
आणि मीच माझ्याच आयुष्याला नविन वाट दाखवणारा....
PRIYA GAWAI
|
0
comments
]
0 comments
Post a Comment