"काय चाल्लेय तुझं मघापासून? किती ते चॅनल बदलणार? एक धड तरी ठेव किंवा तो टि.व्ही. बंद तरी कर." आई थोडी चिडून म्हणाली. करण आणि त्याची आई सुलभा बाजूलाच बसलेले टि.व्ही. पाहत होते. करणने रिमोटची सगळे नंबर तीनदा दाबून पाहिले होते. टि.व्ही.वर काहीच मनोरंजन चालू नव्हतं.



"हो गं! ठेवतो ना.", करणनेही मग आठ्या पाड्लया अन एक फिल्मी चॅनल ठेवला.



"वेल्कम टू बॉलिवूड न्यूज!", टिव्हीवरील वी.जे. सांगत होती, "सुमीत सिन्हा और गौरी पंडित की नयी ‘सात सपने’ बॉक्स ऑफिसपर पीट गयी। ये उन दोनोकी साथ साथ दूसरी फिल्म है। ..."



खरं तर सॅवियोची वाट पाहत करण वेळ मारत होता. बॉलिवूड न्यूज वर मेनका शिवाय आणखी कोणीही करणला उल्साहित करत नसे. आईही पेपर वाचित होती. त्यामुळे टि.व्ही. खरं कोण पाहत होतं हे सांगणं कठीणच होतं.

"कधी येणार सॅवियो? ५ चे साडेपाच झालेत." करणने घड्याळाकडे पाहिलं. आई पेपरात. तिथे टि.व्ही.वर त्या वी.जे.ची बडबड चालू .

"और अब एक खास खबर! हजारों दिलों की धडकन मेनका के बारेमें नयी कॉण्ट्रोवर्सी आजकल सुनाई दे रही है।", करणने घड्याळाकडे बघत टि.व्ही.कडे कान टवकारले. "सुना है की मेनकाके एक खास करीबी एन.आर.आय. दोस्तने उनके और अपने पुराने अफेयर के बारेमें किसी न्यूज चॅनल को काफी गुप्त बातें बतायी है। जिसमें एक काफी इंटरेस्टींग लव्ह ट्रायंगल भी है। और तो और ये भी सुनाई दिया है की मनिष भट़्ट उसपे नयी फिल्म भी बना रहें है। तो आखिर इस फिल्म में हिरोईन मेनका की रायवल मालविका काश साईन होही जायेगी। आखिर मनिष भट़्ट सेक्स और मालविका के बगैर कैसे रहेंगे? देखतें है की मेनका के सेक्रेटरी टिक्कू की इसपे क्या राय है? ... "



"एन.आर.आय.? अफेयर? लव्ह ट्रायंगल?", करण ताडकन उठला.



समोर टि.व्ही.वर थुलथुलीत टिक्कू अवतीर्ण झाला. करणचं लक्ष पुढच्या मुलाखतीत लागलं होतं, "टिक्कूजी क्या ये सच है की मेनकाजीके कोई अमरिकी दोस्त आजकल मुंबईमें आये हुऎ हैं?"

"जी।!, टिक्कूने आपल्या बारीक आवाजात म्हटलं.

"क्या ये भी सच है की मेनकाजी और उनके बीच काई करीबी रिश्ता था?"

"नही। बिलकूल नहीं।"

करनने भुयव्या उंचावल्या.

"आप तो मुकर रहें है पर हमने ये सुना है की ये रिश्ता इसिलिये टूट गया था की कोई और मेनकाजीके जिंदगी में आ गया था?"



"देखिये ये मुझे मालूम नही। लेकीन मुझे येह मालूम है की मेनकाजी और उनके दोस्त के बीच अब सिर्फ अच्छी दोस्ती है। और कुछ नही। जो हुआ वो क्या और क्यूं हुआ ये मुझे पता नही। लेकीन जो अभी है वो सिर्फ गहरी दोस्ती है बस्स।"



"लेकीन फिर भी आपको कुछ तो पता होगा ही?"



"देखिये मैं दस साल पहले मेनकाजीका सेक्रेटरी बना हूं। ये बात उस्से भी पाच छे साल पुरानी है। मुझे इसके बारे में कुछ भी नही पता। लेकीन इतना पता है की मेनकजी इस अफवा की वजह से काफी व्यथित हैं और टेलिफोन कॉल्सभी नहीं ले रहीं। इसिलिये मेरी आप सब लोगोंसे गुजारिश है की प्लीज आप इस बात को इतना महत्त्व देना बंद किजीये।"



"लेकीन ये एन.आर.आय दोस्त हैं कौन? क्यूं उन्हे इतना गुप्त रखा गया है?"

"देखिये वो खुद अपनी शख्सियत गुप्त रखना चाहते हैं। ये उनकी मर्जी है।"

"लेकीन फिर मनिष भट़्ट की फिल्म के बारेमें आपका क्या खयाल है?"



यावर टिक्कू थोडा भडकला, "मनिष भट़्ट उन्हे चाहें उस विषय पर फिल्म बना सकतें है। वैसेभी कॉट्रोवर्सी उनसे दूर कहा रहती है। ये शायद उनका और एक गिमिक होगा!"



"क्या येह सच है की इन मेनकाजीके दोस्त का नाम गौतम दोशी है?.... "

"ओह माय गॉड!", करणने आ वासला होता.... तिकडे टिक्कूचं "नो कमेण्ट्स प्लीज!" ची टेप सुरू झाली. आईने थोडक्यात करणकडे बघितलं अन पुन्हा पेपरात मान घातली.

"आई! माहितीये?", करणने गोंधळलेल्या स्वरात आईला म्हटलं.



"काय?"

"परवा काय झालं?" "काय?",

आहे!" आईने पेपरातच डोकं घातलं होतं.

" एका ऑनलाईन चॅट मध्ये मला कुणीतरी माथेफिरू भेटला होता. म्हणाला की तो मेनकाचा मुलगा

आईने झटकन पेपर दूर सारला, "काय?", हा ‘काय’ मघासच्यापेक्षा नक्कीच मोठा होता.



"हो! आणि म्हणाला की मेनकाचं गौतम दोशी नावाच्या माणसाशी अफेयर होतं आणि ती एका तिसऱ्या माणसाकडून प्रेगेनण्ट राहिली होती. तिने ते मूल जन्माला घातलं अन सोडून दिलं. तोच तो तिचा मुलगा!"

"कोण होता तो? आणखी काय म्हणाला?", आईने गोंधळून विचारलं.

"काही नाही म्हणे, एवढंच हे सगळं तिची फिल्म लाईन जॉईन होण्याधीचं लफडं होतं."



आई दोन मिनिटं थोडी चकितच होती मग तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत गेले.



"फिल्मी आयुष्याधीचं नं मग ते खोटच असणार? पेपराझींचा फक्त सेलिब्रिटीच्या फिल्मी आयुष्यावर कण्ट्रोल असतो. त्याधी काय झालं ह्यावर त्यांचा फक्त कयास असू शकतो. मला तर बाई ही त्या मेनकाला फसवायची कुणाचीतरी चाल वाटते. बऱ्याच दिवसात तिच्याकडून कुठलं गॉसिप आलं नव्ह्तं. तोच तिचा एन.आर.आय मित्र कुठूनतरी आला, तिला भेटला अन ह्या अफवा सुरू. तो जो कुणी तुला ऑनलाईन भेटला ना तोही ह्या गटातला असेल.", आई शांतपणे पुन्हा पेपरात डोकं घालून म्हणाली.



करणही आईच्या ह्या विचारावर सहमत झालेला वाटत होता.

पण त्याच्या मनात कुठेतरी एक हुरहुर लागली होतीच. तेवढ्यात सॅवियो आला.



"लेट्स गो! उशीर झालाय ना. सॉरी रे! घरी मम्मी लेट आली. मग मोठा भाऊ म्हणून क्रिस्टल ला सांभाळत थांबावं लागलं. ओह बाय द वे... हॅलो आण्टी!"करणच्या आईने हसत विचारलं, "हॅलो. कशी आहे क्रिस्टल? गेल्या आठवड्यापासून के.जी.त जायला लागली ऎकलं मी?"



"हो! के.जी. एकदम फर्स्टक्लास चाल्लंय.", सॅवियो डोळे मिचकावले, "आत्ता मलाच ए, बी, सी शिकवते!

"मिश्किलीत आई उठली अन करणला, "लवकर ये. जेवायच्या आधी." असं बोलून किचनमध्ये निघून गेली.



करण डेनिम जॅकेट चढवून सॅवियो सोबत बाहेर पडला.

"सॅवियो अरे मी ते तुला सांगितलेलं बघ, ब्लॅकवलचर बद्दल! आठवतंय?"



"कोण तो मेनका हेटर ना? हो. त्याचं काय?"

"आज टिव्हीवर त्याने सांगितलेल्यासारखीच एक न्यूज ऎकली मी. मेनकाचा आधीचा बॉयफ्रेण्ड इंडियात आलाय अन इथे येऊन तिला भेटला. त्यानंतर त्याने त्यांच्या अफेयर विषयीच्या आपल्या काही गुप्त गोष्टी कुठल्यातरी न्यूजचॅनलना कळवल्या. यावर सगळा वादंग उठलाय!"

"वादंग?!", सॅवियो गोंधळला

"अरे कॉण्ट्रोवर्सी रे!", सॅवियो कॉन्व्हेण्ट शाळेत शिकणारा एक अमराठी मुलगा आहे हे करणच्या मग ध्यानात आलं.

"ओके. मग?"

"त्यात त्या मनिष भट़्टने ह्या गॉसिपवर नवा पिक्चर काढायला लावलाय. त्यात तो मालविकाला घेणारेय..."

"काय? मालविका इन मनिष भट़्ट फिल्म? वुह्ह्हू!" सॅवियोने आनंदात टाळ्या पिटल्या. उत्तान मालविकाला छोट्या कपड्यात पाहण्याची स्वप्न सॅवियो उभ्याचा उभ्या पाहू लागला, पण मग ध्यानावर येऊन करणचा सिरियस मूड बघून "ओह्ह बिच्चारी मेनका!" असं म्हणत त्याने आपला आनंदी चेहेरा झटक्यात पालटला.

"इट्स ओके, यू कॅन चियर. नो नीड फॉर अ फॉल्स कॉन्डोलन्स.", करणने थोड्या रागातच म्हटलं.



"फरगेट ईट यार", सॅवियोने आपले नेहेमीचे आवडते शब्द म्हटले, "कशाला ही संध्याकाळ ह्या अर्धवट माहित असल्या नसल्या फिल्मी बातम्यांवर घालवायची? छान पैकी बोलिंग करायाला जाऊ चल."



आणि असं म्हणून त्यांनी आपल्या सायकल्स वर टांग मारली अन ते अंधेरी लिंक रोडला निघाले. संपूर्ण रस्ता सायकल चालवित करण मनात फक्त गौतम दोशीचाच विचार करत होता.....



२०० पॉईण्ट्स! करणचा नवा रेकॉर्ड!

सॅवियो अजून ८० वर! ही अंधेरीचा बोलिंग ऍली करण अन सॅवियोची अत्यंत आवडती जागा.

"मला आज एकही फुल्ल स्ट्राईक मिळाला नाहिये आणि तुला सात मिळले." सॅवियोने गाल फुगवले आणि करणने ऎटीत कॉलर ताठ केली.

"जाऊ दे रे. एव्हरी डॉग हॅज हीज डे!" करणने विनोद केला तसा सॅवियो अजून रागावून त्याच्याकडे पाहू लागला.



आता दिलेलं १०० रूपयांचं क्रेडीट संपत आलं होतं. फक्त एक सेट उरलेला. त्या एका सेटच्या जोरावर सॅवियोने करणला हरवणे शक्य नव्हते. पण तरीही सॅवियोने करणला बोट उंचावून म्हटलं, "क्रॉस दॅट २१० मार्क आणि मी तुला ५० रूपये देईन!"



करणने त्याने दाखवलेल्या स्कोअर बोर्डकडे पाहिले अन त्याच ऍलीत दुसऱ्या कुणीतरी युनिकॉर्न नावाच्या प्लेयरचा २१० चा स्कोर दिसत होता. हे चॅलेंज करणने स्वीकार केलं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला अन आवडीचा ओशन-ब्लू-बॉल व्यवस्थित पुढच्या पिन्सच्या सेटकडे फेकला. बॉलने सरळ दिशा पकडली पण हाय! मध्येच दिशा बदलून एकाही पीनला धक्का न शिवता बॉल गटर मध्ये घुसला.



एक चान्स वेस्ट.

"बूऊऊऊऊ!" सॅवियोने ‘कशी जिरली!" म्हणून करणचा आत्मविश्वास खच्ची करायचे निष्फळ प्रयत्न केले, पण करण खरंच पेटला होता. अजून एक चान्स बाकी होता. तो २१० चा स्कोर त्याच्या जणू जीवनमरणाचा प्रश्न झाला असावा!



करणने पुन्हा त्याचा ओशन-ब्लू बॉल व्यवस्थित बोटांत अडकवला अन त्याच्या लेनच्या बरोबर मध्यभागी उभा राहून बोलिंगची एक्स्पर्ट पोझ घेतली अन खाली वाकून बॉल नीट सरपटत फेकला. तीन सेकंद त्याचा श्वास आतच अडकला असावा...



... आणि बॉल ने स्ट्राईक केलं. आजची ही आठवी स्ट्राईक! करणचा पर्सनल बेस्ट स्कोर!

"जिंकलो!" म्हणत करण सॅवियोला चिडवत ब्रेक डांस करून दाखवू लागला. सॅवियो ओशाळला.



आता स्कोर बोर्ड वर फक्त करणचा कूलकरन आणि यूनिकॉर्नच २१० दाखवत होते.



"हाय करन!", पाठून एक मधाळ आवाज आला.

ब्रेक डांस करत करणने मागे वळून पाहिलं तसं समोर पूजा प्रधान! त्याचा ब्रेक डांस पाहून ती थोडी गोंधळलेलीच दिसत होती.



करणने झटक्यात डांस बंद केला.



"हाय पूजा!", करण थोडक्यात.

"इथे कुठे?", पूजा.

"असंच!", करणचं एका शब्दात उत्तर

"मी तुझं नाव पाहिलं स्कोरबोर्डवर. माझ्याएवढा स्कोर पाहिल्यावर मी म्हटलं बघूया कोण आहे ते. तर तू दिसलास!"

"ओह! म्हणजे यूनिकॉर्न..."

"हो मीच यूनिकॉर्न!"

एका मुलीच्या स्कोरला टफफाईट दिलेली बघून करणचा बेस्ट स्कोरचा आनंद क्षणात मावळला.

"ओके", असं बोलून करण पुन्हा मुका झाला, पूजा कडे बघत.



"आख्ह:अंख्ह!", पाठून कुणीतरी घसा साफ करीत होतं.

"सॉरी!", करणने त्रागा करीत म्हटलं, "सॅवियोही आहे माझ्यासोबत."



"हाय पूजा!", सॅवियो सोज्वळपणे पुढे येऊन म्हणाला.

"हॅलो सॅवियो!", पूजानेही मग दोनच शब्द म्हटले.

पुढची दोन मिनिटं एकमेकांची तोंड बघण्यातच गेली.



"कोल्ड कॉफी?", सॅवियोने एकांत फोडला.

"व्हाय नॉट!", पूजानेही पटकन होकार दिला.

अन तिघे ‘कॉफी डे’ च्या काउन्टर कडे निघाले. पुढे दोघे लव्हबर्ड्स. मागे विसरला गेलेला सॅवियो!



"तर मग आज सॅटरडॆ! काय केलंस?", पूजानं चॉकोलेटमोकाची एक सिप घेत विचारलं.

"काही नाही. आता काही वेळ सॅवियोबरोबर आहे, नंतर संध्याकाळी समीरदादा बरोबर जीम.", करणने कॉफीतच लक्ष घालून म्हटलं. पूजाकडे पाहत एक पूर्ण वाक्य म्हणायला अजून त्याच्यात अवसान आलं नव्हतं. सॅवियो करणची मजा बघत त्याची आईस्क्रीम कॉफी मिटक्या मारत चाखत होता.



"तू काय केलंस पूजा आज?", सॅवियोने मध्येच चोमडेपणा केला तसे करणने डोळे वटारले.

"काही नाही. मीही संध्याकाळी माझ्या वडिलांच्या मित्रांना भेटायला जाणार आहे, जे डब्ल्यू मॅरियट मध्ये"

"कूल. म्हणजे कोणी स्पेशल आहे का?", करणला बोलण्याचा काहीही चान्स न देत सॅवियोने पुढचा प्रश्न केला



"हो माझे पप्पांचे खास दोस्त आहेत. त्यांच्या सोबत फॅमिली डिनर आहे.", पूजा म्हणाली.

"म्हणजे तुझी संध्याकाळ फिक्स आहे.... आऊच्च!!", खालून करणने सॅवियोला एक कीक मारली तसा सॅवियो कळवळला. पूजा गोंधळून सॅवियोकडे पाहू लागली. एक नजर करणकडेही गेली. करणने आपल्याला काहीही माहित नसल्याचे दाखवत पुन्हा जवळजवळ रिकाम्या कॉफी ग्लासमध्ये डोकं घातलं.

"म्हणजे छान!", सॅवियो उसनं हसू आणत पाय लटपटत म्हणाला.



तेवढ्यातच पूजाचा मोबाईल वाजला.



"हॅलो? हा आई बोल... हो माहितीये. हो ग. मी येईन. तुम्ही जा पुढे. टॅक्सी पकडेन. अगं अंधेरी ईस्टलाच यायचंय ना. येईन ना मी. हो हो माहितीये साडेसात. हो गं रूम ३०२. आता नाव का विचारतेयस? आधी मी भेटलेय ना त्यांना लहान असताना. हो गं. गौतम दोशी! ओके? आय नो मॉम...."



"फुर्र्र्र्र!", ‘गौतम दोशी’ नाव ऎकताच सॅवियोने कॉफी फुंकली अन करण ताडकन खुर्चीवरून उडाला.

पूजा दोन मिनिटं घाबरलीच.

"काय झालं. एनी प्रॉब्लेम?", पूजा ने विचारलं.

"तू गौतम दोशी म्हणालीस?", करणने प्रश्न केला. अगदी पूजाच्या डोळ्यात पाहत (!)

"हो. का? मी सांगितलं ना ते पप्पांचे फ्रेण्ड. तेच ते. यूएस वरून आलेत. "

"आय नो! द फार्मा विझार्ड!", करण म्हणाला.

"व्हॉट?", पूजा गोंधळली, "तुला कसं..."

"ते जाऊदे! डू यू नो एनीथींग अबाऊट हीज रिलेशनशिप विथ ..." करणने थोडा आवंढा गिळला, "..विथ फिल्म ऍक्ट्रेस मेनका?"

पूजा संशयित नजरेन दोघांकडे पाहू लागली. आता सॅवियोने कॉफीत तोंड घातलं होतं. तसं तिला करण मेनकाचा फॅन आहे हे माहित होतं पण हा प्रश्न थोडा पर्सनल वाटत होता.

"तू कशा बद्दल म्हणतोयस?"

"टिव्हीवर..."

"हो ते?...", पूजाने करणला तोडलं, तिच्या चेहेऱ्यावरचे संशयित भाव नाहीसे झाले होते, "..आय थिंक इट्स जस्ट अ गॉसिप!"



"आर यू श्युर?"

"हो. पण असं का विचारतोयस?"

करणने ब्लॅकवल्चरची स्टोरी पूजाला सांगू की नको ह्या विचारात काही सेकंद घालवले. मग सॅवियोनेच पुढाकार गेतला... "काही नाही गं. यू नो करण इज कन्सर्न्ड अबाऊट मेनका. ही इज हर फॅन ना..."

पूजा हसली आणि म्हणाली, "तुला हवं तर मी त्यांच्या कडून काही खबरबात काढते ह्याविषयी. आय कॅन बी अ गॉसिप गल टूडे!", पूजाने डोळे मिचकावले.

करण हसला, "नको इट्स ओके. इट्स कूल."

"...याह जस्ट फरगेट अबाऊट ईट!", सॅवियो. अजून कोण?

"चल मी निघते. बाय! थॅन्क्स फॉर द कॉफी!"

"नो प्रोब्लेम!", करण पुन्हा त्याच्या द्विशब्द संभाषणावर आला.

"बाय सॅवियो!", असं म्हणून पूजा निघून गेली.

"क्या ड्युड! इव्हनिंग स्पेशल झाली म्हणायची!", सॅवियोने करणचा पाय खेचला.

करण थोडा लाजला अन दोघे बील फेडून घरी निघाले. पण येतानाही करणचा फक्त गौतम दोशीविषयीच विचार चालू होता.

**********************************

contd...

0 comments

Post a Comment