"आखों मे तुम्हें बसालूं कभी", टी.व्ही.वर मेनकाचं गाणं चालू होतं. निळा हिरवा समुद्र अन त्याच्या किनाऱ्यावरची ती पांढरी वाळू. त्याच समुद्राच्या पाण्यात भिजलेला कमावते शरीर असलेला देखणा सुपरस्टार अनुज आणि ओलीचिंब कमनिय मेनका ह्यांचं हे मादक गाणं आजच्या घडीचं सुपरहीट गाणं होतं. कित्येक टिनेजर आणि तरूणांना मोहिनी घातलेल्या ह्या जोडीने त्यांच्या नव्या "प्यार का साथ" चित्रपटाने सफलेतेचे रेकॉर्ड्स तोडले होते. कित्येक तरूण मुली आज अनुजच्या प्रेमात अन कित्येक युवक मेनका च्या मादकतेत रंगून गेले होते.
करणही ह्याच टिनेज युवकांतला एक.
गाणं संपलं तरी करणने पडद्यावरून आपली चमकदार नजर हलवली नव्हती. तो मेनकाच्या चिंतनात उसासे टाकत, उजवा गाल तळहातावर टाकून बसला होता. मागून समीरने त्याला डोक्यावर टपली मारली.
"आऊच्च!", करण किंचाळला, "दॅट हर्ट्स!"
"मेनका!", समीरने हृदय पकडल्याचं नाटक केलं, "माय डार्लिंग! मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. माझी ४० वर्षांची म्हातारी! कवळी लाऊन सुरेख हसतेस!!!""दादा! गप्प बस्स हा!", करण चवताळला, "४० नाही, ३९! आणि तुलाच म्हातारी वाटते ती. परवा टीन सेन्सेशन अलिशिया म्हणाली की तिला मेनका सारखं व्हायंचय. सगळे तुझ्यासारखे नसतात. ३३ ऍण्ड स्टील सिंगल! लूक ऍट यु!" करणने जुना सूर छेडला.
"सिंगल! हह! माझ्या तर कित्येक गर्लफ्रेण्ड्स होत्या. तुझ्या वयाचा होतो तेव्हा तिघींना पटवलेलं मी... आणि बाय द वे, तुला किती गर्लफ्रेण्ड्स आहेत रे? " समीरने करणचा दुखती नस दाबली, "ओह! येस! एक आहे ना; पूजा प्रधान! राईट?"
करणने डोळे वटारले...
समीरला आणखीच आवेश चढला....
"प..प्प, पूजा!.... प..प्प..प्रोजेक्टचं विचारायचं होतं.... प...प्प...पप्पी देशील का?", समीरने करणचा पाय खेचला. करणच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र सॅवियो तोंड दाबून हसत होता. करणचं मुलींशी होणारं संभाषण त्याच्या मित्रमंडळीत आधीच थट़्टेचा विषय झालं होतं.
"काय सॅवियो! मी बरोबर म्हणतोय ना?", समीरने सॅवियोलाही मस्करीत सामिल करून घेतले.
"तो कशाला हो म्हणेल तुला? तो माझा मित्र आहे.", करणने सॅवियोकडे बघितलं, सॅवियो आधीच हसत हसत लोळू लागला होता
"काय सॅवियो! मी बरोबर म्हणतोय ना?", समीरने सॅवियोलाही मस्करीत सामिल करून घेतले.
"तो कशाला हो म्हणेल तुला? तो माझा मित्र आहे.", करणने सॅवियोकडे बघितलं, सॅवियो आधीच हसत हसत लोळू लागला होता
"यू बोथ आर इमंपॉसिबल!", करण रागावला अन तणतणत त्याच्या खोलीत निघून गेला.
आईने पलिकडून समीरला नेहेमीची "वयानुसार वाग!" अशी मुळूमुळू ताकिद दिली. पण सहा महिन्यांसाठी नेव्हीतून घरी आलेला समीर, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आस्वाद घेणारा, अशी करणची थट़्टा करणं कशी सोडेल? शेवटी लहान भाऊ असतातच कशाला?
काही वेळ गेला. करण अजूनही त्याच्या बिछान्यावरच बसून रागाने धुमसत होता. तसा इतरांनी त्याची थट़्टा करणं त्याला गैर वाटत नव्हतं पण मेनकाला ‘म्हातारी’ म्हणवून समीर दादाने पुन्हा लाईन क्रॉस केली होती. मेनका करणची ड्रीमगल. करण लहान होता तेव्हाच मेनका फिल्मस्टार म्हणून नावारूपास आली. तेव्हापासूनच करण हातातले खेळणे सोडून, टिव्ही वर मेनकाची गाणी, इण्टरव्ह्यू, चित्रपट लागले की ते तल्लिनतेने बघायचा. का कुणास ठाऊक? पण तिचा चेहेरा बघताना एक वेगळाच आनंद वाटायचा त्याला. ती जाणिव अश्लील नव्हती. उलट एक आपुलकी होती, कौतुक होतं. दोन वर्षांपूर्वी तिच्या "रूमानी बदन" ह्या चित्रपटावर अश्लिलतेचा आरोप करणाऱ्या काही संस्थांच्या सभासदांनी थिएटरवर केलेल्या दगडफेकीत करणही जखमी झालेला. तरी त्याने रक्तबंबाळ अवस्थेत दुसऱ्या थियेटर मध्ये जाऊन तो चित्रपट पूर्ण पाहिला. त्यामुळे मेनकाला त्याच्या हृदयात लहानपणासून हळवा कोपरा लाभला होता. म्हणतात ना पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही. तसलंच ते. फक्त फरक एवढा की मेनका करणचं पहिलं, मधलं अन कदाचित शेवटचं प्रेमही होतं!
घरी समीरनंतर १८ वर्षांनी उगवलेलं हे शेंडेफळ आणि त्याची सोंगं घरातल्यांनी तळाहातावरच्या फोडासारखी जपली नसती तर नवलंच. करण लहान असतानाच, अगदी एक दोन वर्षाचा असेल, त्याचे अन समीरचे बाबा हार्ट अटॅकने वारले. बिझिनेसमध्ये बराच तोटा झाला होता. मलबार हिलचे मोठे घर विकून तेव्हापासूनच समीर, त्याची आई अन छोटा करण हे "रूपवते कुटुंब" उपनगरात राहू लागलं. आईने बॅंकेत मॅनेजर म्हणून नोकरी धरली, म्हणूनच समीरचं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकलं. करण कडून त्यांना जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. करणला आयआयटीत जायच होतं. तसं करण अभ्यासात हुशार. त्यामुळे ती चिंता नव्हती. समीरने नेहेमी वडिलधारा थोरला भाऊ म्हणून करणचा नीट सांभाळ केला होता. बाबा सोडून गेल्यावर १८ वर्षांच्या समीरने, अशा कठीण परिस्थितीत, आईला जमेल तेवढी मदत करून मोठा मुलगा म्हणून आपलं कर्तव्य नीट बजावलं होतं. म्हणूनच एवढी वर्षं समीरने लग्नही केलं नव्हतं.
तसंही नेव्ही वाल्यांचं कौटुंबिक आयुष्य यथातथाच. सहा महिने घरी, सहा महिने डॉकवर. कुठली मुलगी अशा परिस्थितीत समीरला सांगून आली असती. तरीही, दिसण्यात ह्रितिक रोशनश्टाईल, समीर अजून अविवहित कसा हे आजूबाजूच्या लोकांना न सुटणारं कोडं होतं. आईनेही शेवटी कंटाळून नियतीसमोर हात टेकले होते. धाकट्या करणला नेव्हीत इंटरेस्ट नव्हता हे तिचं नशीब!
"मोठा भाऊ आहे म्हणून काय झालं. मीही त्याच्या सरांना, ल्युटिनिण्ट देशपांडेना, "चकण्या" म्हणतो तेव्हा कित्ती चिडतो तो! जर त्याला थट़्टा सहन होत नाही तर मी का सहन करावी?", करण त्याच्या कोंदट खोलीत बसून मनातल्या मनात स्वतःची बाजू मांडत होता.तोच दारावर ठकठक झाली. समीर आणि सॅवियो आत आले. "सॉररी ब्रो!", समीर करणच्या खांद्यावर हात टाकून बसला आणि त्याने त्याचा खांदा आपुलकीने दाबला."फरगेट इट यार!", सॅवियोने नेहेमीचे तीन शब्द म्हटले.करण काहीच बोलला नाही. दोन मिनिटं शांततेत गेली. तिघे खोली न्याहळत बसले होते. तसं खोलीत बेड, टेबललँप, अभ्यासाची पुस्तकं आणि कॉंप्युटर सोडून एकच गोष्ट ठळक होती. अन ती म्हणजे भिंतींवर चिकटवलेले मेनकाचे मोठ्ठाले पोस्टर्स. डोळे बंद करूनही "सुकलेल्या फेविकॉलचा वास म्हणजे करणची खोली" असं सहज सांगता येत असे.
"चकण्या ...ल्युटिनिण्ट कमांडर ....देशपांडे.", करण हळूच म्हणालासमीर सुरूवातीस थोडा गुरगुरला पण करणच्या बालिश डोळ्यांत बघून मग शांत चित्ताने पुटपुटला "ओके! चकण्या ‘सडू’ ल्युटिनिण्ट कमांडर देशपांडे! खूष?"
करणने हसून दाखवलं. पण प्रकरण इथवरंच संपलं नाही.
(म्हणजे संध्याकाळी पिझ्झा पार्टी करायची शिक्षा समीरला ठोठवण्यात आली. अन समीरने ती आनंदात पूर्णही केली.)
Contd...
|
0
comments
]
0 comments
Post a Comment