साहित्य -१ १/२ कप बासमती तांदुळ ३० मिनिट भिजवुन ठेवावेत२०० ग्रॅम बटाटे सालं काढुन चिरलेले२०० ग्रॅम गाजरं सालं काढुन चिरलेली५० ग्रॅम काजु५० ग्रॅम बदाम भिजवुन सालं काढलेले२५ ग्रॅम बेदाणे१०० ग्रॅम कांदा बारीक चिरलेला४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या१ टी. स्पून आलं पेस्ट१ टी. स्पून लसूण पेस्ट१/२ टी स्पून हळद१ टी स्पून ति़खट१ कप दही१ टी स्पून केशर२ टी स्पून दुध१/३ कप पुदिन्याची पानं बारीक चिरुन१/३ कप कोथिंबीर बारीक चिरुन६ हिरवे वेलदोडे६ लवंग१ दालचिनी३ तमाल पत्र१२० ग्रॅम तुपमिठ चविनुसारगुलाब पाणी गरजेनुसारभिजवलेली कणिक बिर्याणीचं भांडं सील करायला


कृती

१. भिजवुन ठेवलेले तांदुळ एका भांड्यात घेऊन त्यात ३ कप पाणी टाका. त्यात ३ वेलदोडे, ३ लवंगा,दालचिनीचे २ तुकडे, आणि १ तमालपत्र टाका आणि भात पुर्ण शिजवुन घ्या. जास्तीचं पाणी काढुन टाका आणि झालेला भात बाजुला ठेवा.


२.दही व्यवस्थीत फेटुन घ्या आणि त्याचे २ भाग बनवा.


३.केशर पाण्यात भिजवुन घ्या आणि दह्याच्या एका भागात घाला.


४.एका पॅन मध्ये तुप गरम करुन त्यात उरलेला खडा मसाला घाला आणि मध्यम आचेवर तडतडेपर्यंत परता.


५.बारीक चिरलेला कांदा घालुन तो सोनेरी रंग येईपर्यंत परता. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं - लसुण पेस्ट घाला आणि १ मिनिट परतुन घ्या. त्यात हळद, तिखट आणि सर्व भाज्या घालुन व्यवस्थीत परतुन घ्या.


६. यात दह्याच्या दुसरा भाग व २/३ कप पाणी घालुन उकळी येईपर्यंत ठेवा. भाज्या पुर्ण पणे शिजवुन घ्या.


७. भाज्या शिजल्या की त्यात काजु, बदाम,बेदाणे घाला.


८. यात केशर घातलेल्या दह्याचा थोडा भाग, पुदिना आणि कोथिंबीर घाला.


९.मग त्यावर निम्मा भात घाला आणि पुन्हा त्यावर दह्याचं मिश्रण, पुदिना आणि कोथिंबीर घाला. यावर पुन्हा एकदा उरलेल्या भाताचा थर द्या व भांडं घट्टं झाकण लावुन बंद करा. वाफ जाऊ नये म्हणुन झाकण कणिक लावुन सील करुन घ्या.


१०. हे भांडं प्री-हिटेड ओवन मध्ये १५-२० मिनिटं ठेवा आणि गरम गरम सर्व करा.

0 comments

Post a Comment