मनविसेचा विद्यापीठाला दस का दम
- म. टा. प्रतिनिधी

परीक्षांचे निकाल वेळेवर का लागत नाहीत... परीक्षा विभागातून पेपर गहाळ होण्याचे प्रकार समोर आल्यावर सुरक्षेसाठी काय उपाय केले... कामकाजाचे परीपत्रक मराठीत का नाही... मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना पडणारे असे १० प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथीर् सेनेने प्रतिनिधिक स्वरूपात विद्यापीठ प्रशासनाला विचारले आहेत.

विद्यापीठाचा कारभार पाहता विद्यार्थ्यांच्या मनात असे प्रश्न पडणे साहजिकच आहे. तमाम विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी विद्यापीठाला 'दस का दम' भरला असल्याचे मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी सांगितले. हा गैरकारभार चव्हाट्यावर आणल्यामुळे विद्यापीठ मनविसेच्या सदस्यांना जाणूनबुजून त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणारा दुष्यंतसिंह जाडेजा सर्व पेपरना हजर असूनही तो एका विषयात गैरहजर असल्याचे निकालपत्रात लिहिल्याबद्दल मनविसेचे पदाधिकारी परशुराम तपासे यांनी परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांच्याकडे विचारणा केली. शिंदे यांनी प्रश्नांची उत्तरे देण्याएवजी तपासे यांना खोट्या आरोपात अडकवले, असे नमूद करून, मनविसेविषयी आकस ठेवण्याऐवजी विद्यापीठाने कारभारात सुधारणा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

0 comments

Post a Comment