‘ राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हा गुंडांचा पक्ष असून त्यावर बंदी घाला ’ , अशी मागणी समाजवादी पार्टीच्या अबू असीम आझमी यांनी मोठ्या तावातावाने केली खरी, पण त्याचवेळी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसला होता, सोलापुरातील कुख्यात गुन्हेगार एम. डी. शेख...दंगल माजवणे, खून, फसवणूक, असे कितीतरी गुन्हे या शेखवर दाखल आहेत. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकवण्याचा प्रकार आझमींना चांगलाच नडणार आहे.
राज ठाकरे आणि अबू आझमी यांच्यातला ‘ पंगा ’ सर्वश्रुत आहे. काठ्या वाटणं, तलवारी वाटणं, आझमगडहून माणसं बोलावणं, त्या माणसांच्या तंगड्या तोडणं, अशी शाब्दिक चकमक त्यांच्यात चांगलीच रंगली होती. राज यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारवर अजूनही हल्लाबोल सुरूच ठेवलाय, पण अबू आझमी मात्र मधला बराच काळ शांत होते. आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यावर त्यांनी पुन्हा राज यांना लक्ष्य करायचं ठरवलंय. तसेच काहीसे संकेत त्यांनी आज पुण्यात दिले, पण हा डाव त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4145132.cms
|
0
comments
]
0 comments
Post a Comment