दारूच्या दोन बाटल्या आडव्या झाल्यावर सदा आणि मध्या चांगलेच रंगात आले.
”यार मध्या, मला कधी कधी वाटतं ना की समाजासाठी काही तरी केले पाहिजे यार.” सदा म्हणाला.
”मग करू की” - मध्या म्हणाला.
”पण काय करणार यार?”
”अरे, उद्या गांधी पुण्यतिथीनिमित्त आपल्या कॉलनीत रक्तदान शिबिर आहे, तिथंच रक्तदान करू.”
”अरे ते तर आपण मागच्या वर्षी पण केलं होतं!”
”हो, मग या वर्षी पण करू, तेवढंच पुण्य गाठीला.”
दुसऱ्या दिवशी दोघेही मोठ्या उत्साहाने रक्तदानासाठी रांगेत उभे होते. तेवढ्यात संयोजक आला व म्हणाला, ”सॉरी,
तुम्हा दोघांना रक्तदान करता येणार नाही.”
”का?” दोघेही एकसुरात म्हणाले.”
कारण मागच्या वर्षी तुम्ही दोघांनीही दिलेल्या रक्तात रक्तघटकांऐवजी फक्त अल्कोहोलच निघालं!”
|
0
comments
]
0 comments
Post a Comment