”मी तिच्याकडे एकटक पाहायचो…”
”आणि ती?”
”तीही माझ्याकडे पाहायची…”
”काय सांगतोस!”
”…तसा मला भास व्हायचा.”
”अच्छा!”
”ती मला खूप आवडायची.”
”आणि तिला?”
”तिलाही मी खूप आवडायचो…”
”खरंच!””हो, असं मला वाटायचं.”
”मग प्रॉब्लेम काय झाला यार?”
”माझं तिच्यावर नितांत प्रेम होतं, हे त्रिकालाबाधित सत्य होतं…”
”मग?”
”पण… एक कटुसत्यही होतं.”
”काय?”
”मी तिला अजिबात आवडत नव्हतो आणि तिचं माझ्यावर तसूभरही प्रेम नव्हतं!”
”अरेरे….!”

0 comments

Post a Comment