रीटा आणि मुक्ताची आयुष्याच्या जोडीदारासंबंधी चर्चा सुरू होती-”काय
, राजू की संजू? कोणाची निवड करणारेस?”
”कोणाचीच नाही!”
”का गं, बिच्चारा राजू तर तुझ्या कित्ती पुढे-पुढे करीत असतो.”
”म्हणूनच, असा पुढे-पुढे करून थुंकी झेलणारा शेळपट जोडीदार मला नकोय!”
”आणि संजू? तो तर तुझ्या कित्ती मागे लागलाय, तू जिथे जातेस तिथं असतो.”
”…असा सतत मागे-मागे राहून गोंडा घोळणारा वेडपट तर अजिबात नको!”

0 comments

Post a Comment