श्री. प्रमोद मुतालिक यांची सुटका केल्यानंतर `सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधलेला संवाद…

प्रतिनिधी : पबमध्ये हल्ला केल्याने काय परिणाम झाला ?
श्री. प्रमोद मुतालिक :
१. असभ्य व गैरवर्तन करणार्‍या हिंदु मुलींना चाप बसला. आता त्या पबमध्ये जाण्यास व असभ्य वर्तन करण्यास घाबरतील. संस्कृती रक्षणाचे हे कार्य संपूर्णपणे यशस्वी झाले. मुलींचे पबमध्ये जाणे थांबवले पाहिजे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सौ. निर्मिला व्यंकटेश यांनी स्वत: म्हटले होते.
२. आतापर्यंत आमचे कार्य कर्नाटकपर्यंत सीमित होते. आता या संस्कृतीच्या अभिमानी कृतीमुळे आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. माझ्या अटकेमुळे उत्तरप्रदेश, दिल्ली, कोलकाता, विजयवाडा, भोपाळ येथे सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. श्रीरामसेनेला राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व प्राप्‍त झाले आहे. राष्ट्रभर याविषयी चर्चा सुरू झाली.
३. कर्नाटकचे मुख्यमंत्री व राजस्थानचे मुख्यमंत्री यांना पबसंस्कृतीच्या विरोधात प्रतिपादन करावे लागले.
४. मंगळुरूच्या या घटनेने हिंदु संस्कृती वाचवण्याविषयी चर्चा सुरू झाली.

प्रतिनिधी : कर्नल पुरोहित व तुमचे काय संबंध आहेत का ?
श्री. प्रमोद मुतालिक : कर्नल पुरोहित व मालेगाव बाँबस्फोट यांच्याशी काहीएक संबंध नाही.

प्रतिनिधी : पुढचे नियोजन काय ?
श्री. प्रमोद मुतालिक : संघटनेचे राष्ट्रीयकरण करणे, सर्व हिंदु संघटनांना संघटित करणे व हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हेच कार्य आम्ही आगामी काळात जोराने करणार आहोत.

प्रतिनिधी : तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे का ?
श्री. प्रमोद मुतालिक : भाजपचे माजी उपाध्यक्ष व राजकारणातून काही वर्षांपूर्वी संन्यास घेतलेले श्री. गोविंदाचार्य व त्यांची संघटना आमच्या पाठिशी आहे. पुणे येथील हिंदुत्ववादी संघटनाही आमच्या संपर्कात आहेत.

प्रतिनिधी : कर्नाटक पोलिसांनी अटक केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती ?श्री. प्रमोद मुतालिक : कर्नाटक पोलिसांनी माझ्यावर हजार खटले भरले, तरी हिंदुत्वाचा लढा आम्ही थांबवणार नाही.

0 comments

Post a Comment